Tuesday, 11 April 2023

पांढऱ्या जांभळाची शेती

 पांढऱ्या जांभळाची शेती 


शास्त्रीय माहिती :

शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाच्या जांभळाचे शास्त्रीय नाव ‘सायझिजियम क्युमिनी’ (Syzygium cumini) असे आहे. ‘मिरटशिए’ नावाच्या कुळातील हे जांभूळ रानमेवा प्रकारात मोडते.हे जांभूळ प्रामुख्याने दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियामध्ये आढळते. पांढऱ्या रंगाच्या जांभळाची रोपे ओडिशात मिळतात.



जमिन:

पांढऱ्या जांभळाची झाडे पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये वाढतात. गायरानाच्या हलक्या व पडिक जमिनीपासून ते सुपीक, मध्यम काळय़ा आणि माळाच्या जमिनीत ही झाडे चांगली वाढतात. . कमी खर्चात, कमी पाण्यात आणि कमी औषधामध्ये हे फळपीक पदरात पडते. फळमाशी आणि खोड अळी हे झाडांचे शत्रू आहेत. त्यापासून झाडाचे संरक्षण करण्यासाठीही जास्त काही करावे लागत नाही. 

हवामान: 

माफक तापमान असलेले वातावरण ही झाडे वाढायला पोषक ठरते.




औषधी  उपयोग

जांभूळ हे तर औषधी गुणधर्मानी युक्त फळ असल्यामुळे त्याचे महत्त्व काही औरच असते. पांढऱ्या रंगाच्या जांभळाचे महत्त्व पारंपरिक जांभळाप्रमाणे आणखी वैशिष्टय़पूर्ण ठरते. आंबट, तुरट, मधूर, रसाळ आणि गरदार अशा या फळामध्ये ‘व्हिटामिन सी’ २२ टक्के तर’’व्हिटामिन ए’ ११ टक्के यासारखे औषधी गुणधर्माचे विविध उपयुक्त घटक आहेत. जांभूळ मधुमेहावर विशेष गुणकारी मानला जातो. जांभळाच्या बियाणांचे चुर्ण मधुमेहावरील उत्तम औषध ठरते. जांभूळ रक्त शुध्द करते. यकृत मजबूत होते. मूत्राशयासारखे आजारही नाहीसे करते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप व अन्य उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभूळ पाचक आहे. जांभूळ झाडाची पाने शरीराच्या स्नायूंचे दुखरेपण कमी करण्यास मदत करतात. साधारणपणे १२ मीटर उंचीच्या एका झाडावर ७०० किलोपर्यंत जांभूळ फळे लगडतात.

बाजारपेठ: 

कमी खर्चात जांभळाचे पीक घेतले जाते. सध्या जांभळाची हार्वेस्टिंग सुरु आहे. ज्याची मार्केटला किंमत 400 रुपये प्रतिकिलो इतकी आहे. यामुळे त्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे. पांढऱ्या रंगाच्या जांभळात विविध औषधी गुण आहेत. यामुळे याची मागणी देखील जास्त आहे.या फळाची मागणी दिल्ली बेंगलोर मुंबई पुणे यांसारख्या मेट्रो शहरात मोठ्या प्रमाणात असते. या फळाला इतर जांभळापेक्षा अधिक बाजार भाव प्राप्त होत असतो, या पांढऱ्या जांभळाला सुमारे चारशे रुपये प्रति किलोपर्यंत असा दर मिळत असल्याचे सांगितले जाते.



फळ उपलब्ध

पांढरे जांभूळ हे बाहेरून तसेच आतून देखील पांढऱ्या रंगाचे असून यास बाजारामध्ये आता बऱ्याच प्रमाणात मागणी होत आहे. पारंपरिक जांभळय़ा रंगाचे जांभूळ पावसाळय़ात सुरुवातीला खाण्यासाठी उपलब्ध होतात. परंतु पांढऱ्या रंगाचे जांभूळ त्या अगोदरच म्हणजे उन्हाळय़ात शरीर थंड ठेवण्यासाठी एप्रिलमध्येच चाखायला मिळते.

 झाडांचे महत्त्व: 

जगात मधुमेही रुग्ण वरचेवर वाढत आहेत. त्यामुळे जांभळाचे महत्त्वही अबाधित राहणार आहे. शेतीकारणाचा विचार करताना शेतात काय पिकते, यापेक्षा बाजारात काय विकते, हे ज्या शेतकऱ्याला कळते, तोच शेतकरी खऱ्या अर्थाने प्रगतशील म्हणून ओळखला जातो, पांढरे जांभूळ शेती शेतकऱ्यांना प्रगतशील म्हणून ओळख निर्माण करून देताना त्यांची आर्थिक पत वाढविण्यासाठी निश्चितच हातभार उचलण्यास नवा आदर्श ठरण्याची अपेक्षा आहे. विशेषत: नैराश्येतील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा विचार महत्त्वाचा वाटतो.



Monday, 10 April 2023

काळा ऊस' हा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास खूप फायदेशीर आहे




काळा ऊस' हा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास खूप फायदेशीर आहे

भारतात काळ्या ऊसाची लागवड प्रामुख्याने मध्यप्रदेश, गुजरात आणि दक्षिण भारतातील काही भागात केली जाते. त्याचा फायदा बद्दल बोललो तर ते असंख्य आहेत.त्यामुळे त्याची मागणी अचानक वाढू लागली असून शेतकरी हे त्याच्या लागवडीत अधिक भर घालताना दिसत आहेत. या काळ्या ऊसाच्या अनेक औषधी गुणधर्मामुळे या ऊसाची मागणी आता वाढू लागली आहे. त्यामुळे शेतकरीही त्याच्या लागवडीवर अधिक भर देताना दिसत आहेत.


काळा ऊस. Sugarcane variety that is a little black to purple in colour is commonly referred to as Black sugarcane.

 काळा ऊस हा नेहमीच्या उसापेक्षा वेगळा असतो; ते नेहमीच्या तुलनेत मऊ आणि गोड असते, जे बहुतेक रस आणि साखर किंवा गूळ तयार करण्यासाठी वापरले जाते.


वाशीम शहरापासुन ५ कि.मी अंतरावर काटेपुर्णा आणि पुस नदीच्या पात्रात वसलेले काटा हे गाव महाराष्ट्रात काळ्या ऊसाच्या लागवडीसाठी प्रसिध्द आहे.या गावात उत्पादन घेत असलेल्या काळ्या ऊसाची सर्वत्र चर्चा आहे.१८ व्या शतकात मुंबईचे शिल्पकार म्हणून ख्याती असलेले जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांनी खास मॉरिशस या देशातुन काळ्या ऊसाचे वाण आणले होते. कालंतराने तेच वाण काटा या गावातील तत्कालिन शेतकऱ्यांनी मिळवुन ऊस शेती करायला सुरूवात केली. म्हणुनच या ऊसाला मॉरीशियस ऊस असे देखील म्हटले जाते.आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असलेल्या काट्याच्या या काळया ऊसाला महाराष्ट्र राज्यासह शेजारील मध्यप्रदेश, तेलंगणा व गुजरात या राज्यातही मागणी आहे.



    काळ्या  उसाचे फायदे :

1) काळ्या उसामुळे पुरळ बरा होतो :-

 अनेकदा आपल्या चेहऱ्यावर आणि शरीरावर काळे पुरळ येतात.यातून सुटका करण्यासाठी लोक कोणते उपाय करतात, किती पैसे खर्च करतात हे अनेकांना माहीत नसते,पण त्याचा फारसा परिणाम होत नाही तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला हा त्रास होत असेल तर तुम्ही त्यांना काळ्या उसाचे सेवन करण्याचा सल्ला देऊ शकता. हे मुरुमे दूर करतो आणि वाढण्यास प्रतिबंध करतो.

2) काळा ऊस सुरकुत्या दूर करतो :-


 वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या येणं सामान्य गोष्ट आहे, पण महिलांना ही गोष्ट अनेकदा आढळते. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर रोज उसाचा रस प्या.त्यामुळे तुमची त्वचा ताणली जाईल आणि सुरकुत्या पडणार नाहीत. चेहऱ्यावर महागडी क्रीम आणि औषधे वापरण्यापेक्षा रोज 1 ग्लास काळ्या उसाचा रस पिणे चांगले.

3) झटपट ऊर्जेसाठी काळा ऊस उत्तम आहे :-


 उन्हाळ्यात लोक लगेच थकतात. कारण उच्च तापमानामुळे अस्वस्थता वाढते. जे तुमच्या शरीरातून जास्त उर्जा घेते आणि तुम्हाला लवकरच थकवा जाणवू लागतो.अशा स्थितीत तुम्ही बाजारात उपलब्ध अनेक एनर्जी ड्रिंकचे सेवन करता, ज्यामुळे तुम्हाला लगेच एनर्जी मिळते. हे तुम्हाला झटपट ऊर्जा देते, परंतु ते तुमच्या शरीराला खूप नुकसान करत. त्यामुळे अचानक साखरेची पातळी वाढते. म्हणूनच झटपट उर्जेसाठी तुम्हीकाळ्या उसाचा रस पिऊ शकता. तुम्हाला ते कोणत्याही रस्त्याच्या चौकात सहज मिळेल आणि ते प्यायलाही खूप चवदार आहे. त्याचाही कोणताही दुष्परिणाम होत नाही.

4) श्‍वासाची दुर्गंधी आणि दातांच्या आजारावर गुणकारी :- 

खाण्याच्या चुकीच्या सवयी मुळे अनेकदा तुमच्या पोटात समस्या निर्माण होतात.त्यामुळे श्वासात दुर्गंधी येण्याची समस्या निर्माण होते. ही समस्या तुम्हाला इतरांसमोर वेगळे पाडू शकते. त्याच वेळी यामुळे वेदना किंवा पायोरियासारखे रोग अनेकदा आपल्या दातांमध्ये आढळतात.ज्या पासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काय करता हे माहीत नाही, पण आता तुम्ही या सर्व गोष्टींपासून सहज सुटका मिळवू शकता. काळ्या उसाचे सेवन केल्याने तुम्ही यापासून सहज सुटका करू शकता.

5) काळा ऊस वजन कमी करण्यास उपयुक्त आहे :-


 अनेकदा लोकांचा असा समज असतो की मिठाई खाल्ल्याने तुमचे वजन वाढते, पण तसे नेहमीच नसते. काळ्या उसाचे सेवन केल्याने तुम्ही तुमचे वजन सहज वाढण्यापासून रोखू शकता. दररोज मर्यादित प्रमाणात याचे सेवन केल्याने तुमचे वाढते वजन रोखण्यास मदत होते.      








आधुनिक ड्रोनची निर्मिती : शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

 आधुनिक ड्रोनची निर्मिती : शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा


.नाशिकच्या सारंग माने या तरुणाने आधुनिक ड्रोनची निर्मिती केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सारंग यासंदर्भात काम करत होता. या ड्रोनमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल फवारण्यासाठी फायदा होणार आहे. सारंगने तयार केलेल्या या ड्रोनला शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे.

ड्रोनची वैशिष्ट्ये :

1.या ड्रोनची 16 लिटर कॅपिसिटी आहे.

2. हा ड्रोन वीस फूट उंचीवर जाऊ शकतो.

3. दोन ते पाच किलोमीटर पर्यंत ड्रोनची रेंज आहे. म्हणजे इतकं क्षेत्र तुम्ही फवारणी करू शकतात.

4. या ड्रोनला ऑटो सिस्टीम आहे. एकदा तुम्ही तुमचं फवारणी करण्याचं क्षेत्र रिमोट वरती निश्चित केल्यानंतर ड्रोन      ऑटोमॅटिक पूर्ण क्षेत्र फवारणी करेल.

5. या ड्रोनची बॅटरी तुम्ही 900 वेळा रिचार्ज करू शकता इतकी तिची कॅपिसिटी आहे.

6. या ड्रोनच वजन हलकं असल्यामुळे तुम्ही सहज दुचाकी वरती देखील ड्रोन तुमच्या शेतात घेऊन जाऊ शकता.

7. ड्रोन पूर्णपणे रिमोट कंट्रोल आहे. तुम्ही एका जागेवर बसून सर्व ऑपरेटिंग करू शकता.

8. विशेष म्हणजे कोणत्याही लिक्विडची फवारणी तुम्ही या ड्रोनद्वारे करू शकता.

9. तुम्ही दिवसभरात तुमचं कितीही पीक असेल तरी फवारणी करू शकता.

10. चांगल्या प्रतीचा शेतकऱ्यांना फायदेशीर असा हा ड्रोन आहे.


शेतकऱ्यांसाठी खास सूट

शेतकऱ्यांच हित लक्षात घेता हा ड्रोन तयार केला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ड्रोन कसा परवडेल हे लक्षात घेऊनच किंमत कमी करण्यात आली आहे. साधारण 8 लाख रुपयांचा ड्रोन शेतकऱ्यांना फक्त 2 लाख रुपयांमध्ये विक्री केला जाणार आहे. त्यात शेतकरी गट असेल तर त्यावर 50 ते 75 टक्के सबसिडी दिली जाणार आहे.


जास्त ड्रोन निर्मिती करण्याचे व्हिजन

कृषी उड्डाणमार्फत जास्तीत जास्त ड्रोन निर्मिती करण्याचं  व्हिजन आहे. त्या संदर्भात आम्ही प्रयत्न करत आहोत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हा ड्रोन  विकसित केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. या ड्रोनने फवारणी केल्यामुळे  औषधांची देखील बचत होईल. तसेच हा ड्रोन घेतल्यानंतर  शेत माल फवारणी झाला तर इतरांना देखील हा ड्रोन फवारणी करण्यासाठी देऊ शकता. यामुळेपैसे मिळू शकतात.

सारंग माने फोन नं : 9595597583




Sunday, 9 April 2023

आधुनिक शेती : शेतात चिया बियाची लागवड, कमी जागेत मिळेल अधिक नफा

 आधुनिक शेती : शेतात चिया बियाची लागवड, कमी जागेत मिळेल अधिक नफा


आजकाल लोक आरोग्याबद्दल अधिक जागरूक झाले आहेत आणि आरोग्याची खास काळजीही घेतात. व्यायामापासून ते सकस आहारापर्यंत लोक फार सतर्क झाले आहेत. या हेल्दी डाएटमध्ये लोकांनी आपल्या ड्रायफ्रूट्समध्ये चिया बियांचा देखील समावेश केला आहे. याची जगात मोठी मागणी आहे आणि भारतात बाहेरून आयात केली जात आहे. तथापि, अनेक शेतकरी पारंपारिक शेती वगळता नवीनवीन प्रयोग शेतीत करीत असून यात चिया बियांचाही समावेश आहे. पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून शेतकरी चिया बिया देखील लागवड करू शकतात, ज्याला आता सर्वाधिक मागणी आहे 




पारंपारिक शेतीला चांगला पर्याय

पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून शेतकरी चिया बिया देखील लागवड करू शकतात, ज्याला आता सर्वाधिक मागणी आहे. खास बाब म्हणजे मागणीबरोबरच त्याचे भावही बाजारात जास्त आहेत, त्यामुळे शेतकर्‍यांना चांगला नफा देखील मिळतो. त्यामुळे आपण चिया बियाची लागवड करुन कमी वेळेत चांगला नफा मिळवू शकता.

चिया बियाणे म्हणजे नेमके काय?

चिया बियाणे हे इतर खाद्य बियाणा प्रमाणेच आहेत. त्यांच्यामध्ये असलेल्या पोषक आणि औषधी गुणधर्मामुळे खाण्यामध्ये त्याचा वापर करतात. आरोग्या संबंधित समस्या दूर करण्यासाठी याचा अधिकचा उपयोग होतो. चिया बियाणांचा आकार खूप बारीक असून बियाणांचा रंग हा पांढरा, तपकिरी किंवा काळा असतो



महागड्या दराने होते विक्री

अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वेळी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात याचा उल्लेख केला होता. वास्तविक, या बिया 1000 ते 1200 रुपये प्रति किलो दराने ऑनलाईन विकल्या जात आहेत आणि तेही महागड्या दराने शेतकऱ्यांकडून विकत घेतले जात आहे. या बिया फारच लहान दिसतात, ती पांढरी, तपकिरी आणि काळ्या रंगाची असून शरीराला ऊर्जा देण्यासाठी हा एक चांगला ऊर्जा स्त्रोत मानला जातो. हे मुळात मेक्सिकन पीक आहे.

कसे सुरू करावे?

पिकाला तणांच्या प्रादुर्भावापासून वाचवण्यासाठी हाताच्या सहाय्याने शेतात 2-3 वेळा तण काढून टाकावे. शेतात लागवडीनंतर 10-15 दिवसांच्या आत वृक्षारोपणही करावे. त्याची लागवड तयार करण्यास 90 ते 120 दिवस लागतात. चिया बियाणांची लागवड केल्यापासून तीन महिने 15 दिवसांमध्ये उत्पादन मिळते.लागवडीनंतर 40-50 दिवसातच पिकामध्ये फुले येतात आणि 25-30 दिवसांत बिया पिकवून तयार करतात. पीक पिकताना वनस्पती आणि तुरे पिवळे होतात. पिकाची कापणी केली जाते व ती साफ केली जाते व सुकविली जाते आणि बाजारात विकली जाते.

कोणत्या मातीत येते हे पीक?

बर्‍याच अहवालांमध्ये तज्ज्ञांच्या माध्यमातून असे म्हटले गेले आहे की त्याची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये सहज करता येते. तथापि, हलकी माती असलेल्या मातीमध्ये त्याचे पीक चांगले आहे. तसेच यामध्ये कीटकनाशकांची फारशी गरज नसते आणि शेणखतदेखील यासाठी फार प्रभावी आहे.

किती बियाणे आवश्यक?

एक एकरसाठी सुमारे 4-5 किलो बियाणे आवश्यक आहे. यानंतर, एकरी 7 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात याची पेरणी केली तर चांगले उत्पन्न मिळते असे म्हटले जाते.

चिया बियाणांमध्ये औषधे गुणधर्म

चिया बियाणांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते, चिया बियाणांमध्ये पोटॅशियम, फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, जस्त, तांबे, सोडियम फॉस्फरस, मॅगनिज आदी पोषक तत्त्व असतात. यामुळे चिया बियाणांना अधिकची मागणी असते. विशेष म्हणजे बारामाही महिने या बियाणांना मागणी असते. त्यामुळे दर हे टिकून असतात. कमी वेळेत अधिकचे उत्पन्न यासाठी हा योग्य पर्याय असून या भागातही उत्पादन घेता येत

चिया बियांचे प्रकार 

चिया बियांचे मुख्यतः दोन प्रकार आहेत; पांढऱ्या आणि काळ्या बिया, जरी दोन्हीमध्ये पौष्टिक फरक इतका किरकोळ आहे की बहुतेक जण त्यांना पूर्णपणे समान मानतात.

1) काळ्या चिया बिया:

काळ्या चिया बियांमध्ये पांढऱ्या बियाण्यांपेक्षा थोडे अधिक प्रथिने असतात आणि ते पांढऱ्या जातीपेक्षा जास्त उत्पन्न देतात.

2) पांढरे चिया बियाणे:

काळ्या बियाण्यांपेक्षा पांढऱ्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड जास्त असते. हे फरक अनेकदा अगदीच किरकोळ असतात आणि ते सापडतही नाहीत, परंतु सार्वजनिक प्राधान्यांबद्दल, काळ्या बियांचा वापर मुख्यतः बियाणे किंवा तेल म्हणून केला जातो तर पांढरे चांगले पीठ किंवा जेवण बनवतात.




चिया बियांचे फायदे

1. चिया सीड्स हे ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि सहा फॅटी अॅसिडचे समृद्ध स्रोत आहेत जे मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

2. चिया बिया ऑस्टिओपोरोसिस रोखण्यास मदत करतात.

3. कॅल्शियम आणि मॅंगनीजसाठी शिफारस केलेल्या दैनंदिन सेवनाच्या 18% चीया बियांच्या सर्व्हिंगमध्ये असतात, जे तुम्हाला निरोगी हाडे आणि तोंडी आरोग्य राखण्यास मदत करतात.

4. ते बद्धकोष्ठताचा सामना करण्यास मदत करतात

5. प्रथिने सामग्रीच्या बाबतीत चिया बियाणे जवळजवळ अंड्याच्या मूल्यासारखेच असतात, म्हणून ते शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा एक उत्तम स्रोत बनवतात आणि त्यात कोणतेही कोलेस्ट्रॉल नसते.

6. चिया बियांमध्ये भरपूर फॉस्फरस असते आणि पेशी आणि ऊतींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी शरीराला प्रथिने संश्लेषित करण्यासाठी हा घटक आवश्यक असतो.

7. मेक्सिको, अर्जेंटिना, बोलिव्हिया आणि पेरूमध्ये चिया बियांचे सर्वाधिक उत्पादन दर नोंदवले जातात.

8. इन्सुलिनच्या प्रतिकाराशी लढा देऊन चियाचा रक्तातील साखरेवर स्थिर प्रभाव पडतो.

9. चिया बिया पूर्णपणे ग्लूटेन मुक्त असतात

10.फक्त एक चमचा चिया बियांमध्ये 5 ग्रॅम फायबर असते.

11.चिया बिया अंड्यांचा उत्तम पर्याय आहेत.

12.फ्लॅक्ससीडपेक्षा चिया बियाणे वापरणे खूप सोपे आहे.

13.चिया बिया हे अँटिऑक्सिडंट्सचे समृद्ध स्त्रोत आहेत जे मुक्त रॅडिकल्सच्या उत्पादनाशी लढा देतात, जे कर्करोगास कारणीभूत ठरतात.

14.चिया बिया मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तदाब सुधारतात आणि एकूण, एलडीएल आणि ट्रायग्लिसराइड कोलेस्टेरॉल कमी करताना चांगले कोलेस्ट्रॉल देखील वाढवतात.

15.ट्रिप्टोफॅन झोपेच्या तीव्र इच्छाशक्तीसाठी जबाबदार असताना, चिया बिया भूक, झोप आणि मूड सुधारतात.

16.चिया बियांना मिश्रणाची आवश्यकता नसते आणि ते कच्चे खाल्ले जाऊ शकतात, लापशी, पुडिंग्ज आणि स्मूदीमध्ये जोडले जाऊ शकतात.




Saturday, 8 April 2023

बायो-व्हिलेज : सिक्कीमची सेंद्रिय ‘तपश्चर्या’

 बायो-व्हिलेज : सिक्कीमची सेंद्रिय ‘तपश्चर्या’

भारतातील कीटकनाशकांची उलाढाल २०२०पर्यंत ४८४ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज ‘केन रिसर्च’च्या ताज्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. देशात कीटकनाशकांचा वापर किती व्यापक प्रमाणात आहे, याचा अंदाज येण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. कीटकनाशके, खते, तणनाशके अशा रसायनांच्या शेतीमध्ये होत असलेल्या अनिर्बंध वापरामुळे तयार होणाऱ्या शेतीमालातही त्यांचे अंश उतरतात. जमीन आणि पाण्याचे स्रोतही प्रदूषित होतात. कीटकनाशकाचे अंश असलेले अन्नपदार्थ खाणे मानवी शरीराला धोकादायक असते. हा धोका अगदी कर्करोगासारख्या विकारात परिवर्तित होऊ शकतो किंवा जनुकीय पातळीपर्यंत पोहोचून पुढच्या पिढीत व्यंगही निर्माण करू शकतो. शिवाय मधमाशांसारखे उपयुक्त कीटक मारले गेल्यामुळे, नियंत्रित न होणारी तणे वाढल्यामुळे नैसर्गिक चक्राची हेळसांड होते आहे. भारतीय आंबा, तसेच अन्य शेतीमालाला परदेशातून नाकारले जाण्यासारखे प्रकार रसायनांच्या अतिवापरामुळेच घडतात.

सिक्कीममधील बहुतांश शेतकरी नैसर्गिक शेतीच करत होते. तेथील रासायनिक खतांचा वापर प्रति हेक्टरी केवळ ५.८ किलो एवढाच होता. त्यामुळे खतांचा सर्वांत कमी वापर करणाऱ्या राज्यांमध्ये सिक्कीमचा तिसरा क्रमांक लागत होता. शिवाय १५ हजार हेक्टरवर घेतल्या जात असलेल्या वेलची उत्पादनासाठी कधीही रासायनिक खते वापरण्यात आली नव्हती. तेथील पावसावर केल्या जाणाऱ्या शेतीची उत्पादकता कमी होती. त्यामुळे सेंद्रिय शेती राबवण्यासाठी अनुकूल वातावरण तिथे होते. 




 राज्याची अत्यंत संवेदनशील अशी परिसंस्था जपण्याच्या दृष्टीने सरकारने राज्यातील सगळीच शेती सेंद्रिय बनवण्याचा मानस २००३मध्ये विधानसभेत बोलून दाखवला आणि त्याचा ठराव मंजूर करण्यात आला आणि कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यामध्ये उद्दिष्टे ठरवून नियोजन करण्यात आले. सेंद्रिय शेतीचे धोरण तयार करण्यात आले. १७ सप्टेंबर २००३ रोजी सिक्कीम राज्य सेंद्रिय शेती मंडळही स्थापन करण्यात आले. २००३मध्येच रासायनिक खतांवर अनुदान देणे बंद करण्यात आले. खतांची किरकोळ विक्री करणाऱ्यांना दिले जाणारे वाहतूक, हाताळणी अनुदान आणि कमिशन २००६-०७पासून बंद करण्यात आले. रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे थांबवून त्या जागी टप्प्याटप्प्याने सेंद्रिय खतांचा वापर केला जाण्यासाठी सात वर्षांचे नियोजन करण्यात आले.

         बायो-व्हिलेज विकसित करण्यासाठी गावे दत्तक घेणे, गांडूळ खत तसेच कम्पोस्ट खत तयार करण्यासाठी अनुदान देणे, जैविक खते, तसेच प्रमाणित सेंद्रिय खतांची उपलब्धता करणे, यांसारखे उपक्रमसिक्कीम सरकारने राबवले. ‘बायो-व्हिलेज’ म्हणून विकसित करण्यासाठी सरकारने २००९पर्यंत शंभरहून अधिक गावे दत्तक घेतली आणि त्याचा फायदा १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना झाला. नाझिताम आणि मेलिदारा येथील सरकारी शेतांचे रूपांतर ‘ऑरगॅनिक फार्मिंग सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये करण्यात आले. सेंद्रिय शेतीतील विविध प्रयोग तेथे केले जाऊ लागले आणि त्याची प्रात्यक्षिकेही शेतकऱ्यांना दाखवली जाऊ लागली.

सेंद्रिय शेतीचे मुख्य तत्त्व म्हणजे होता होईतो आपल्या शेताच्या बाहेरील गोष्टींवर अवलंबून राहायचे नाही. म्हणजे काय, तर गायी-गुरांच्या शेणापासून, शेतातल्या काडीकचऱ्यापासून कंपोस्ट किंवा गांडूळखत तयार करायचे, कीटकनाशके वापरायची वेळ आलीच, तर शेताच्या बांधावरच्या कडुनिंबासारख्या झाडांपासून ती तयार करायची, शेतीसाठी लागणारे बियाणे आपल्याच शेतात तयार करायचे, इत्यादी इत्यादी. हीच गोष्ट ओळखून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सिक्कीम सरकारने प्रशिक्षण कार्यक्रमांवर भर दिला. शिवाय त्यापेक्षा अधिक जी उत्पादने लागतील, ती सरकारी माध्यमातून विश्वासार्ह पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली. मातीची समृद्धता वाढवण्यासाठी हिरवळीच्या, तसेच जैविक खतांच्या वापरावर भर देण्यात आला. त्याशिवाय बायोडायनॅमिक फार्मिंग, ऋषी कृषी, पंचगव्य शेती, नैसर्गिक शेती आदी पद्धतींमधील काही गोष्टींचाही त्यात समावेश करण्यात आला. बीजनिर्मितीसाठी प्रोत्साहन देऊन ते कार्यक्रम राबवण्यात आले. माती परीक्षण प्रयोगशाळा, एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रयोगशाळा, पॅकेजिंग युनिट्स, संशोधन केंद्रे आदींची उभारणी, तसेच प्रशिक्षण आणि क्षमतावृद्धी आणि शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण असे उपक्रम सिक्कीम सरकारने राबवले. त्यासाठी टप्प्याटप्प्याची उद्दिष्टे ठरवण्यात आली आणि ती गाठण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करण्यात आले. सरकारने शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी उद्युक्त केले, प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

सेंद्रिय शेतीमालाला नेहमीपेक्षा चार ते सहा पट अधिक किंमत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार; रसायनांचा वापर नसल्यामुळे शेतीत शाश्वतता राहणार; सेंद्रिय शेती पाहण्यासाठी पर्यटनात वाढ होणार; प्रदूषके नसल्याने शेतीमाल आरोग्यदायी असणार; निसर्गाचे रक्षण होणार आणि बाह्य घटकांवरील अवलंबित्व संपल्याने शेतकरी स्वयंपूर्ण होणार, अशा अनेक गोष्टी सेंद्रिय शेतीमुळे सिक्कीममध्ये साध्य होणार आहेत.

सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. तिला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी प्रयत्न तर हवेतच; मात्र शेतकऱ्यांचीही साथ महत्त्वाची आहे. 




Ten Important Farm Machinery with Uses

  Ten Important Farm Machinery in India with Uses Plough : Tractor Ploughing is the most common and efficient farming practice. Plough is th...