Monday, 3 April 2023

कृषी विज्ञान केंद्र / Krishi Vigyan Kendra (KVK) :

 

कृषी विज्ञान केंद्र / Krishi Vigyan Kendra (KVK) :

राज्यातील कृषि व संबंधित विभागातील अधिकार्यांना व कर्मच्यार्यांना नवनवीन कृषि उच्च तत्राज्ञानाबाबत चारही कृषि विध्यापिठामार्फत प्रशिक्षण दिले जाते. विध्यापिठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान प्रदर्शने, प्रात्याक्षिके , मेळावे, प्रकाशाने, शिवार फेरी व प्रशिक्षणाद्वारे राज्याच्या विस्तार यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जाते. कृषि विद्यापीठांतर्गत केंद्रांमार्फत व खाजगी व्यवस्थापनाखाली प्रत्येक जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या केंद्रामार्फत हे कार्य केले जाते. तसेच कृषि प्रशिक्षणाचे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. राज्यातील कृषि विस्तार यंत्रणेला नवीन विकसित झालेल्या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षित करणे आणि यांच्यामार्फत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी विध्यापिठातील संशोधकांपर्यंत पोहोचवून शेतकर्यांना आवश्यक असणारे संशोधन विद्यापीठात करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.


 कृषि विज्ञान केंद्रे
Sr.NoName of KVK ProgrammeCo-ordinatorContactE-mail
1Krishi Vigyan Kendra, DhuleDr. Dinesh Nandre, Programme Co-ordinator02562-230362pckvkdhule@rediffmail.com
2Krishi Vigyan Kendra, Mohol Dist. Solapur ( Solapur- II )Dr. Tanaji Walkunde, Programme Co-ordinator02189-233001kvkmohol@yahoo.com,kvkmohol@rediffmail.com
3Krishi Vigyan Kendra, Mamurabad Farm, Jalgaon ( Jalgaon - II )Dr. Hemant Baheti, Programme Co-ordinator0257-2020510kvkjalgaon@rediffmail.com,pckvkjalgaon@gmail.com
4Krishi Vigyan Kendra, Borgaon, Dist. Satara ( Satara - II )Prof. Mohan Shirke, Programme Co-ordinator02162-295625kvkborgaon_satara@yahoo.com




B. NGO & Other Institute KVKs

Sr.NoName of KVK ProgrammeCo-ordinatorContactE-mail
1Krishi Vigyan Kendra, Babhaleshwar Dist. Ahmednagar ( Ahmednagar - I )Dr. Sambhaji Nalkar, Programme Co-ordinator02422-252414kvkahmednagar@yahoo.com
2Krishi Vigyan Kendra, Nashik (YCMOU) ( Nashik - I )Shri.Raosaheb Patil, Programme Co-ordinator0253-2231715kvknashik@rediffmail.com
3Krishi Vigyan Kendra, Baramati, Dist. Pune ( Pune - I )Dr. R. S. Jadhav, Programme Co-ordinator0211-2255207kvkbmt@yahoo.com
4Krishi Vigyan Kendra, Kolde Dist. NandurbarShri. Rajendra Dahatonde, Programme Co-ordinator02564-240544kvk_ndb@yahoo.com
5Krishi Vigyan Kendra, Pal Dist. Jalgaon ( Jalgaon - I )Mr. S. J. Mahajan, Programme Co-ordinator02584-288439kvk_pal@yahoo.co.in
6Krishi Vigyan Kendra, Kegaon , Dist. Solapur ( Solapur -I )Dr. Lalasaheb Tambade, Programme Co-ordinator02172-350359kvksolapur@yahoo.co.in
7Krishi Vigyan Kendra, Kalwade Dist. Satara ( Satara -I )Dr. B. S. Khandekar, Programme Co-ordinator02164-288070pckvkkarad@rediffmail.com
8Krishi Vigyan Kendra, Prakash Nagar Dist. SangliShri. Aslam Shaikh, Programme Co-ordinator0233-2311024kvksangli@rediffmail.com
9Krishi Vigyan Kendra, Talsande, Dist. Kolhapur ( Kolhapur - I)Dr. Jaywant Jagtap, Programme Co-ordinator0231-2653426kvkkolhapur@gmail.com
10Krishi Vigyan Kendra, Narayangaon Dist. Pune ( Pune -II )Shri. Prashant Shete, Programme Co-ordinator02132-242080gmnkvk@gmail.com
11Krishi Vigyan Kendra, Malegaon Dist. Nashik ( Nashik - II )Shri. Amit Patil, Programme Co-ordinator0253-2577666rardc.kvknsk@gmail.com
12Krishi Vigyan Kendra, Kanerimath, Dist. Kolhapur ( Kolhapur -II)Dr. Ravindra Singh, Programme Co-ordinator0231-2980001kvkkolhapur2@gmail.com
13Krishi Vigyan Kendra, Dahigaon ne Dist. Ahmednagar ( Ahmednagar -II )Dr. Shamsundar Kaushik, Programme Co-ordinator02429-272030kvkdahigaon@gmail.com



3

शेवगा पावडर : बचतगटातील / महिलांसाठी उद्योग

 बचतगटातील (SHG) महिलांना, शेवगा पावडरचा चांगला उद्योग रता येईल. शेवगा लागवडीसोबत पानांची देखील विक्री करता येते किंवा शेतातच एक प्रक्रिया युनिट सुरू करता येते.

शेवगा पानांच्या पावडरचे (मोरिंगा पावडर) फायदे :

शेवग्याच्या शेंगांना इंग्लिश मध्ये ‘Drumstick tree’ असे म्हणतात. या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव ‘मोरिंगा ओलिफेरा’ (Moringa oleifera) असे आहे. शेवग्याच्या पानांची पावडर केली जाते आणि या पावडरला Moringa powder किंवा Drumstick leaves powder असेही म्हणतात. Horseradish tree, ben oil tree अशीही काही नावे आहेत. शेवग्याला हिंदी मध्ये ‘सहजन’ असे नाव आहे.

आपण महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा भारतातील लोक अगदी चवीने आणि वेगवेगळ्या पद्धतीने शेवग्याची भाजी किंवा शेवग्याची आमटी करून खातात. साऊथ इंडियन पदार्थातीळ सांबर मध्ये तर शेवग्याच्या शेंगा असतातच. आपल्याकडे ही वनस्पती अगदी सहज उपलब्ध होते. म्हणूनच आपण एक भाजी म्हणून शेवग्याचा वापर करतो. पण प्राचीन काळापासून माणूस या वनस्पतीचा औषधी उपयोग करत आला आहे. आधुनिक काळात अमेरिकेसारख्या देशात मोरिंगा पावडर भारतातून आयात केली जाते. तिकडे किंवा आपल्याकडेही शेवग्याला मोरिंगा सुपरफूड (Moringa superfood) असेही ओळखले जाते.

शेवगा किंवा मोरिंगा पावडर व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अमिनो असिड्स ने समृद्ध असते.
जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध (Moringa powder is Vitamins and Minerals rich)

हे संशोधनातून सिद्ध झाले आहे की मोरिंगा पावडरमध्ये संत्र्याच्या सात पट व्हिटॅमिन सी असते. गाजराच्या चार पट व्हिटॅमिन अ (vitamin A) असते. दुधाच्या चार पट कॅल्शिअम (calcium) असते. केळीच्या तीनपट पोटॅशियम असते. पालकाच्या पाऊण पट लोह (iron) असते. आणि दह्याच्या दुप्पट प्रथिने किंवा Proteins असतात. हे वाचल्यानंतर कुणीही समोर आलेली शेवग्याची भाजी, वरण, सांबर किंवा आमटी नाकारणार नाही. कारण इतकं पोषणतत्वे खचून भरलेली भाजी आपल्याकडे सहज मिळते. चला तर पाहूया या वनस्पतीचे आरोग्यासाठी होणारे फायदे.

नैसर्गिकरित्या वजन कमी करणारा पदार्थ – Moringa powder Best food for weight loss for male and female

शेवग्याच्या पानांमध्ये क्लोरोजनिक ऍसिड (Chlorogenic acid) हे antioxidents असते जे नैसर्गिकरित्या चरबी घटवण्याचे काम करते म्हणजेच Natural Fat Burner असते. हे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्याचे काम करते. शेवग्याचे नियमित सेवन वजन कमी करण्यात मदत करते.

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मोरिंगा पावडर Moringa powder benefits for male and female haircare

मोरिंगा पानांची पावडर मध्ये रक्त शुध्द करणारे घटक असतात. केस आणि अमिनो असिड्स (amino acids) आणि केरॅटीन प्रोटीन (Keratine proteine) असतात. या घटकांमुळे केस लांब आणि दाट होतात.

मोरिंगा पावडर पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते Moringa powder helps is Metabolism


मोरिंगा पावडर हे चयापचय क्रिया सुधारणारा आहार (Metabolism boosting diet) म्हणून ओळखले जाते. यामध्ये जे तंतुमय पदार्थ असतात ते पचन कार्याची गती वाढवतात. बद्धकोष्ठता कमी होते. पोटातील इन्फेक्शन पण या वनस्पतीचे सेवन केल्याने कमी होते.

मोरिंगा पावडर त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते Moringa powder keeps skin young and healthy

प्रदूषण, घाम, उष्णता यामुळे आपल्या त्वचेवर विविध जिवाणू विषाणू याची वाढ होते. त्यामुळे त्वचेचे सौंदर्य कमी होते. यात अँटीफंगल, अँटीबॅक्टरीअल अनो अँटिटॉक्सिक घटक असतात ते या जिवाणूंची वाढ प्रतिबंधित करतात. यामध्ये व्हिटॅमिन अ जाइत प्रमाणात असते. व्हिटॅमिन अ हा त्वचेला सुंदर ठेवणारा घटक आहे.

म्हणून भरपूर सौंदर्य प्रसाधनांमध्ये मोरिंगा पावडरचा उपयोग केला जातो. यामध्ये लोह असते जे रक्त शुद्ध करण्यास मदत करते. त्यामुळे पिंपल्स चा नाश होतो.

मोरिंगा पावडर लहान मुलांसाठी टॉनिक

शेवगा पावडर मध्ये भरपुर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असते. कॅल्शियम हे हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी आवश्यक असते. यामध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस पण असते जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. म्हणुन मोरिंगा पावडर लहान मुलांसाठी टॉनिक सारखे काम करते

रक्तातील साखर नियंत्रक मोरिंगा पावडर (Moringa powder controls Blood Sugar level )

मोरिंगा पावडरचे नियमित सेवन केल्याने शरीराला खूप फायदे होतात. आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत राहिल्याने एक दिवस त्याची परिणती मधुमेह होण्यात होते. मोरिंगा पावडर रेग्युलर सेवन केल्याने किंवा शेवग्याची भाजी आहारात ठेवल्याने रक्तातील साखर कमी होते. म्हणून मोरिंगा पावडर डायबेटीस नियंत्रक (Moringa powder diabetes controller) म्हणून वापरली जाते.गर्भवती महिलांसाठी फायदेशीर
हे पावडर गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन, मिनरल्स असतात ज्यामुळे गर्भाची हाडे निरोगी तयार होतात. महिलेलाही यातील कॅल्शियम, पोटॅशियम, लोह यांचा फायदा होतो. हे घटक आई आणि बाळ याना निरोगी ठेवण्यात सहकार्य करते.

प्रसुतीनंतर महिलांसाठी फायदेशीर Moringa powder benefits for female in pregnancy

प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर गर्भाशयाचे आरोग्य राखण्यात शेवगा किंवा मोरिंगा पावडर किंवा शेवग्याची भाजी खूप उपयोगी आहे. आणि हे दुभत्या मातांसाठी दूध वाढवण्यात मदत करते. प्रसुतीनंतर होणार त्रास कमी करण्यातही सहाय्य करते.

उच्च रक्तदाब कमी करते Moringa powder lowers blood pressure

मोरिंगा पावडर किंवा शेवग्याच्या शेंगांमध्ये पोटॅशियम खुप प्रमाणात असते. पोटॅशिअम हे उच्च रक्तदाब कमी करण्यात मदत करते. BP कमी करण्यासाठी हा एक चांगला, स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहे.









आशा प्रकारे आहारात समावेश करा

आपण शेवग्याचे आश्चर्यचकित करणारे गुणधर्म पाहिले आहेत. तुम्ही शेवग्याचे सेवन पुढीलप्रमाणे आपल्या आहारात करू शकता

महाराष्ट्रात शेवग्याच्या शेंगा भाजी मंडईत सर्रास उपलब्ध असतात. त्या विकत घेऊन तुम्ही शिजवलेली भाजी करू शकता. आमटी किंवा रस्सा भाजीही करता येईल. या शिजवलेल्या शेंगांच्या आतील भाग तुम्ही दातांनी खरडून खाल्ले तर तुम्हाला यातील सगळी पोषणतत्वे मिळतील.

शेवग्याचे सांबर किंवा आपल्या भाषेत वरण करून खावे. खूप स्वादिष्ट लागते.

शेवग्याच्या झाडाची ताजी पाने आणून त्यांचा ज्यूस करून पिता येईल.

ही पाने कोशिंबीर किंवा सलाडमध्ये सुद्धा टाकुन खाता येतील.

हे पावडर बनवून घरात ठेवून रोज सेवन करावे. ही पाने स्वच्छ कपड्यावर हवेशीर खोलीत किंवा सावलीत काहीतरी जाळीदार झाकून वाळवावे लागतील. थेट सूर्यप्रकाशात वाळवू नये. ही पाने वाळायला तीन ते चार दिवस लागतात. वाळल्यानंतर ती मिक्सरमध्ये भुकटी करून हवाबंद डब्यात भरून ठेवावे.

हे मोरिंगा पावडर तुम्ही सलाडमध्ये, भाजीमध्ये किंवा कोमट पाण्यात सेवन करू शकता. 

.शेवग्याच्या वाळलेल्या पानामध्ये ताज्या पानांपेक्षा अधिक पोषकतत्वे असतात आणि वापरण्यास अगदी सहज व सोपे जाते. शेवगा पानांच्या (Moringa Leaves) पावडरची कॅप्सुलदेखील (Moringa Powder Capsule) बाजारात उपलब्ध आहे. बचतगटातील (SHG) महिलांना, शेवगा पावडरचा चांगला उद्योग रता येईल. शेवगा लागवडीसोबत पानांची देखील विक्री करता येते किंवा शेतातच एक प्रक्रिया युनिट सुरू करता येते.  शेवगा वनस्पतीचा प्रत्येक भाग हा शरीरासाठी खूप गुणकारी आहे. आहाराबरोबरच शेवग्याचा वापर पाणी शुद्धीकरणासाठी केला जातो. विदेशात शेवग्याच्या पानांपासून तयार केलेल्या भुकटीचा विविध प्रकारे वापर केला जातो. अशी भुकटीला भावही चांगला मिळतो. शेवग्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, मॅग्नेशिअम, जीवनसत्त्व अ, सी व बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात आढळतात. 

शेवग्याच्या पानाची पावडर तयार करण्याची घरगुती पद्धत 

- शेवग्याची ताजी पाने घेऊन चांगल्या प्रकारे धुवून सावलीत वाळवावीत. पाने सूर्यप्रकाशात वाळवल्यास त्यातील काही प्रमाणात पोषक तत्त्वांचा ऱ्हास होतो.  

- शेवग्याची पाने वाळवताना जाळीदार कापडाने झाकावीत. पाने पूर्णतः वाळण्यासाठी किमान तीन दिवस लागतात.   

- पाने पूर्णतः वाळल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर करावी. तयार पावडर  हवाबंद डब्यात साठवावी, 

फायदे काय आहेत?

शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम व ॲंटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळतात.   

१०० ग्रॅम भुकटीत दुधापेक्षा १७ पट अधिक कॅल्शियम व पालकापेक्षा २५ पट अधिक लोह असते. 

गाजरापेक्षा १० पट अधिक बीटा-कॅरोटीन असते. हे बीटा कॅरोटिन डोळे, त्वचा व रोगप्रतिकारतेसाठी फायद्याचे असते.   

शेवग्याच्या पानांमध्ये क्लोरजेनिक ॲसिड असून, ते नैसर्गिकरीत्या चरबी कमी करण्याचे काम करते. 

शरीरातील जमा होत राहणाऱ्या विषारी घटकाचे विरेचन करण्याचे काम शेवग्याच्या पानांची भुकटी करते. 

शेवगा हा ॲमिनो ॲसिडचा उत्तम स्रोत असून, त्यामुळे केरेटीन नावाचे प्रोटीन तयार होण्यास मदत होते. या प्रोटीनमुळे केस लांब व दाट होतात.   

या भुकटीत असलेल्या तंतूमय पदार्थांमुळे पचनक्षमता सुधारते, तसेच बद्धकोष्टता कमी होते. 

शेवग्यात ॲमिनो ॲसिड ट्रिप्तोफन असून, त्यामुळे मेलाटोनीन हे संप्रेरक तयार होण्यास मदत होते. या सर्व औषधी गुणांमुळे शेवगा ही आरोग्यदायी वनस्पती म्हणून ओळखली जाते.      


Sunday, 2 April 2023

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची रु. १ लाख कोटीची योजना २०२०-२१ ते २०२९-३०

 

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची रु. १ लाख कोटीची योजना २०२०-२१ ते २०२९-३०

केंद्र शासनाच्या अंतर्गत राबवली जाणारी ‘ कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत- वित्त पुरवठा सुविधा ‘ (‘Agriculture Infrastructure Fund’) तसेच कर्जावरील व्याजात ३% सवलत योजेनेची माहिती पाहणार आहोत. या योजने अंतर्गत कोणत्या कोणत्या प्रकल्पासाठी कर्ज मिळू शकते, त्याचा व्याज दर किती असेल, योजनेचा कालावधी किती वर्षाचा असणार आहे, आवश्यक कागदपत्रेअर्ज कुठे करावा या सर्वांची सखोल माहिती पाहणार आहोत.

केंद्र सरकारने या योजने अंतर्गत सुमारे रु. १ लाख कोटी नियतव्यय प्रास्ताविक केला असून ही योजना सन २०२०-२१ ते २०२९-३० या दहा वर्ष कालावधीत राबवणार येणार आहे. या योजने अंतर्गत राज्य शासन पहिल्या वर्षी रु.१० हजार कोटी व त्यानंतर पुढील ३ वर्षांमध्ये  प्रतीवर्ष रु. ३०  हजार कोटी निधी उपलब्ध करणार आहे. या योजनेच्या रु. १ लाख कोटी निधीतून महाराष्ट्रास ४ वर्षांच्या  कालावधीत रु.८,४६० कोटी निधी उपलब्ध होणार आहे. असे या योजनेच्या GR मधे नमूद केले आहे.

या योजनेचा लाभ काय आहे:
  •  काढणी पश्चात पायाभूत सुविधा उदा. गोदाम,पैक हाऊस,कोल्ड स्टोरेज,  प्रक्रिया केंद्र, वाहतुक सुविधा इ .साठी बँके कडून कर्ज मिळेल.
  •  रु. २ कोटी पर्यंतच्या कर्जावर पत हमी.
  • ज्यांना प्रथम कर्ज वितरण ८ जुलै २०२० ला नाहीतर त्या नंतर झाले असेल     असे प्रकल्प व्याजदर सवलतीस पात्र असणार आहेत.
  •  या प्रकल्पांना इतर योजनेतून ही अनुदान मिळू शकेल. हे अनुदान प्रवर्तकाचा प्रकल्पातील आर्थिक हिस्सा म्हणून गणला जाइल. 
  • मात्र, प्रवर्तकाला प्रकल्प किमतीच्या किमान १० टक्के हिस्सा तरी स्वतः घालणे अनिवार्य आहे. 

नोट: 

या योजने अंतर्गत रु. २ कोटी च्या कर्जावर ७ वर्ष कालावधीसाठी ३ टक्के प्रमाणे व्याज सवलत मिळेल.

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात:

१.राज्य यंत्रणा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रस्तावित केलेले सार्वजनिक-खाजगी भागिदारी प्रकल्प.
२. शेतकरी, कृषी उद्योजक, स्टार्ट-अप्स
३. गट- स्वयंसहायता गट, संयुक्त दायीत्व गट
४. बहूउद्देशीय सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था ,संस्था- विविध कार्यकारी सहकारी संस्था (प्राथमिक कृषी पत     संस्था ), सहकारी पणन संस्था,

खालील प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज मिळेल:
  १. काढणी पश्चात व्यवस्थापनाचे प्रकल्प-
  • गोदाम
  • लॉजिस्टीक सुविधा
  • पैक हाऊस
  • प्राथमिक प्रक्रिया केंद्र
  • संकलन व प्रतवारी केंद्र
  • इ-मार्केटिंग प्लेटफॉर्म सह पुरवठा साखळी सेवा
  • शीत साखळी
  • असेयींग यूनिटस
  • रायपनिंग चेंबर्स
  • मूरघास



२. सामुदायिक शेती साठीचे प्रकल्प:
  • केंद्र/राज्य/स्थानिक स्वराज्य संस्था अथवा त्यांच्या अधिनस्त यंत्रणांनी सार्वजनिक-खाजगी भागिदारीतून प्रस्तावित केलेले सामुदायिक
  • शेतीसाठी मालमत्ता निर्मिती प्रकल्प किंवा काढणीपश्चात व्यवस्थापनाचे प्रकल्प.
  • स्मार्ट व काटेकोर शेती करिता पायाभूत सुविधा
  • सेंद्रीय निविष्ठा उत्पादन
  • पिकांचे समूह क्षेत्र तसेच निर्यात क्षेत्रामध्ये पुरवठा साखळी करिता पायाभुत सुविधा विकासाचे निश्चीत केलेले प्रकल्प

ज्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी योजनेच लाभ घेण्यासाठी अर्ज आणि प्रकल्पाचा अहवाल घेऊन बँकेत अर्ज करावा.


अटल भुजल योजना:

 

अटल भुजल योजना:

Atal Bhujal Yojana

भूजलाचा अनियंत्रित उपशामुळे भूजलाची पातळी कमी होत असल्याची दिसते. भुजलामध्ये घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरिता मागणी आणि पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणी द्वारे सहभागी भूजल व्यवस्थापन जास्तीत जास्त सशक्त करण्यासाठी राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन सुधार प्रकल्पाचे म्हणजेच ‘अटल भुजल योजना‘ ची घोषणा केंद्र शासनाद्वारे सन 2016-17 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी करण्यात आलेले होते.


केंद्र सरकार व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील महाराष्ट्र राज्य सह अन्य सात राज्यांमध्ये शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. आणि त्याची घोषणा दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी करण्यात आलेली होती.

अटल भूजल योजना का राबवली जातेय :

महाराष्ट्रामध्ये भूजल उपशाचे प्रमाण जास्त आहे. भूजल उपशामुळे फळ बागायत तसेच कृषी क्षेत्रात करता होणारा उपसा देखील जास्त आहे. त्यामुळे या क्षेत्रातील भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पाणलोटक्षेत्र अति शोषीत, सुरक्षित, अंशतः असुरक्षित या वर्गवारी मध्ये समाविष्ट केलेली आहेत. या भागातील सिंचन विहिरींची क्षमता कमी झाल्यामुळे सिंचन विहिरींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा विपरीत परिणाम भूजलाच्या उपलब्धतेवर आणि गुणवत्तेवर होत असल्याचा दिसून येत आहे. राज्यातील भूजल पुनर्भरण यांची मर्यादा लक्षात घेता भूजल उपशावर मागणी आधारीत व्यवस्थापनाद्वारे नियंत्रण आणणे अधिक उपयुक्त असल्याने महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र शासन पुरस्कृत अटल भुजल योजनेची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे दिसून आलेले आहे.

ही परिस्थिती लक्षात घेता मंत्रिमंडळाच्या दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार राज्यातील भूजल क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने आणि भूजलाची गुणवत्ता आणि उपलब्धता सुधारण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत अटल भुजल (अटल जल) योजना राज्यामध्ये ठराविक 13 जिल्ह्यातील 73 पाणलोट क्षेत्रातील 1339 ग्रामपंचायतीमधील 1443 गावामध्ये राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने खालील शासन निर्णय घेतलेला आहे.


शासन निर्णय

राज्यातील भूजल क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याचा विचार करून भूजलाची गुणवत्ता आणि उपलब्धता सुधारण्याकरिता राज्यातील अति शोषित, शोषित आणि अंशता शोषित पाणलोट क्षेत्रातील ठराविक 13 जिल्ह्यांमधील, 1339 ग्रामपंचायतीमधील, 1443 गावांमध्ये केंद्र सरकार आणि जागतिक बँक यांच्या अर्थसहाय्यित अटल भुजल (अटल जल) योजना अटल भुजल स्कीम केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

अटल भुजल योजनेची उद्दिष्टे :
  • पाणी बचतीच्या उपायोजना आणि पुरवठा व्यवस्थापनाच्या सूत्राचा अवलंब करून भूजल साठ्यात शाश्‍वतता आणणे.
  • सध्याच्या परिस्थितीत कार्यान्वित असलेल्या केंद्र पुरस्कृत आणि राज्‍य पुरस्‍कृत योजना जसे मनरेगा, प्रधानमंत्री कृषी जलसिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन इत्यादी च्या माध्यमातून होत असलेल्या गुंतवणुकीमध्ये एककेंद्रअभिमुखता साध्य करणे.
  • भूजलाच्या शाश्वत विकासाकरिता राज्य जिल्हा आणि ग्रामीण पातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे.
  • सूक्ष्म सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब करून उपलब्ध भूजलाचा वापर मर्यादित करणे.
  • सिंचन व्यवस्थापनामध्ये सुधारणा आणणे.
अटल भुजल योजनेअंतर्गत सामाविष्ट गावांची यादी :

केंद्र सरकार आणि जागतिक बँकेच्या निदर्शनास प्रमाणे प्रकल्पाकरिता क्षेत्र निवड करताना राज्यातील अति शोषित, शोषित आणि अंशता शोषित पाणलोट क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यानुसार राज्यातील सण दोन हजार तेरा च्या भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित 74, शोषित 4 आणि अंशतः शोषित 111 अशा एकूण 189 पाणलोटक्षेत्र पैकी 13 जिल्ह्यातील, 37 तालुक्यातील, 73 पाणलोट क्षेत्रातील, 1339 ग्रामपंचायतीमधील, 1443 गावांची निवड करण्यात आलेली आहे.
अटल भुजल योजनेअंतर्गत सामाविष्ट गावांची यादी खालील तक्त्यात दाखवलेली आहे

Atal Bhujal Yojana Maharashtra Yadi
अटल भुजल योजना अनुदान :
  • योजनेकरता प्राप्त होणाऱ्या निधीपैकी 50 टक्के निधी केंद्र शासनाकडून तर उर्वरित 50 टक्के निधी जागतिक बँकेकडून अनुदान आणि प्रोत्साहन स्वरूपात दिला जाणार आहे.
  • जागतिक बँकेकडून प्राप्त होणारे प्रोत्साहन अनुदान हे देखील केंद्र शासनाकडून प्राप्त होणार आहे.
  • प्राप्त होणारा निधी राज्यस्तरीय प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणेस प्राप्त होणार असल्याने राज्यस्तरीय प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणेमार्फत एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सिंगल नोडल खाते उघडण्यात येईल.
प्रकल्प अंमलबजावणी आणि संनियंत्रण यंत्रणा:
  • अटल भुजल योजनेअंतर्गत सर्व बाबी विविध विभागांशी संलग्न असल्यामुळे प्रकल्प अंमलबजावणी आणि संनियंत्रण सहज शक्य होण्याकरिता राज्यपातळीवर माननीय मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती स्थापन करण्यात येत आहे.
  • तर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आढावा समिती गठीत करण्यात आलेली आहे.
  • याशिवाय जिल्हा पातळीवर प्रकल्प अंमलबजावणी व संनियंत्रण शक्य होण्याकरिता संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अटल भूजल योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे.


भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना: महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना 2023..

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना:  महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना 2023..

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग फळबाग योजना 2022 अंमलबजावणी कार्यपद्धती : त्यामध्ये अर्ज केल्यापासून या योजनेच्या संपूर्ण अंमलबजावणी कश्याप्रकारे होते याची माहिती पाहणार आहोत. जसे कि योजनेत सहभागी होण्याची कार्यपद्धती, फळबाग लागवडीसाठी क्षेत्र मर्यादा किती, लाभार्थी पात्रतेचे निकष, फळबाग लागवड योजनेसाठी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावयाची कामे आणि शासन अनुदानित कामे कोणती, फळबाग लागवड योजनेसाठी अनुदान वितरित करण्याचे निकष, फळबाग योजना अंमलबजावणी कार्यपद्धती  इत्यादी सर्व गोष्टींची माहिती   पाहणार आहोत.




भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2022-
  • महाराष्ट्रात सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजना राबविण्यात येत असून, या योजने अंतर्गत अर्थसहाय्य टप्प्याटप्प्याने दिले जाते.
  • महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी ज्यांचे फळबाग लागवडीकरता दोन हेक्‍टर पर्यंत क्षेत्र मर्यादित आहे. ते शेतकरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत अनुदानास पात्र आहेत. 
  • महाराष्ट्रात ८० टक्के अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत आणि जॉब कार्ड नसल्यामुळे, ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरत नाहीत. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे निश्चित केले आहे.
  • ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून पशुधन व पीक याबरोबरच फळबाग लागवडीला देखील सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत सहभागी होण्याची कार्यपद्धती –
  • या योजनेसाठी राज्य तसेच जिल्हा स्तरावरून वर्तमानपत्रांमध्ये दर वर्षी एप्रिल महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाते. तसेच अन्य माध्यमातून पुरेशी प्रसिद्धी देऊन, इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात येतात. ही अर्ज प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आलेली आहे.
  • इच्छुक शेतकऱ्यांनी जाहिरात दिल्यापासून किमान २१ दिवसात अर्ज सादर करावा लागत होता. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज महाडीबीटी शेतकरी पोर्टल मार्फत स्वीकारले जातात.
  • या अर्ज स्वीकारल्यानंतर या योजनेअंतर्गत तालुकानिहाय सोडत काढून प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करून लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. या सोडतीची माहिती महाडीबीटी पोर्टल वर नोटिफिकेशन द्वारे दर्शविण्यात येते.
  • तालुक्यात नेमून दिलेल्या आर्थिक लक्षांकापेक्षा कमी अर्ज सादर झाले असतील, तर त्या तालुक्यासाठी पुन्हा जाहिरात देऊन ८ दिवसात पुन्हा अर्ज मागवले जातात आणि या प्राप्त अर्जांमधून सोडत पद्धतीनुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
  • ज्या अर्जदाराची निवड झाली आहे, त्याने २ दिवसात आवश्यक ती कागदपत्रे ऑनलाइन महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करणे गरजेचे असते.
  • कागदपत्रे प्राप्त झाल्यास लाभार्थ्याला पूर्वसंमती प्रदान करण्यात येते. तसेच लाभार्थ्यांच्या इच्छेनुसार त्यांना शासकीय किंवा कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून किंवा नारळ रोपे उचल करण्यास परवाना देण्यात येतो.
  • लाभार्थ्याला पूर्वसंमती प्राप्त झाल्यावर ७५ दिवसांमध्ये फळबागेची लागवड करणे आवश्‍यक असते. असे केले नाही, तर त्या लाभार्थ्यांची पूर्वसंमती रद्द करण्यात येते आणि प्रतीक्षा यादीत असणाऱ्या अर्जदारांची त्याच्या ठिकाणी निवड केली जाते.

                                  
फळबाग लागवडीसाठी क्षेत्र मर्यादा किती?
  • या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी कोकण विभागासाठी कमीत-कमी ०.१० हेक्‍टर ते जास्तीत जास्त १० हेक्‍टर तर उर्वरित विभागांसाठी ०.२० हेक्टर ते ६ हेक्टर मर्यादा पर्यंत अनुदान अनुज्ञेय राहील.
  • कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिके लागवड करू शकतो.
  • लाभार्थ्याच्या ७/१२ नोंदीनुसार त्याला संयुक्त खात्यावरील त्याच्या नावे असलेल्या क्षेत्राकरिताच त्याला लाभ घेता येईल.
  • जर लाभार्थ्याने यापूर्वी अन्य कोणत्याही योजनेअंतर्गत किंवा राज्य रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतला असेल, तर ते लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरित कमाल क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभार्थी शेतकरी लाभ घेण्यास पात्र असेल.
फळबाग लागवडीसाठी लाभार्थी पात्रतेचे निकष –
  • फळबाग लागवड योजनेसाठी शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावे शेत जमिनीचा ७/१२ उतारा असणे आवश्यक आहे. जर संयुक्त खाते असेल, तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक राहील.
  • जर लाभार्थ्याची शेत जमीन कुळ कायद्याखाली येत असेल, ७/१२ च्या उताऱ्यावर जर कुळ कायद्याचे नाव असेल, तर ही योजना राबवण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक असेल.
  • सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे कुटुंब केवळ शेतीवर अवलंबून आहे, त्यांना प्राधान्याने या योजनेचा लाभ घेता येईल. त्यानंतर इतर शेतकऱ्यांचा विचार करता येईल.
  • निवड करताना प्राप्त अर्जांमधून अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, अनुसूचित जाती व जमाती, महिला, दिव्यांग यांना प्राधान्य देण्यात येईल.
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी अनुदान अर्थसहाय्य देऊन लाभ देण्यात येणार नाही.
फळबाग लागवड योजनेसाठी आवश्यक कामे –
अ. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावयाची कामे –
  • जमीन तयार करणे.
  • सेंद्रिय खत मिश्रण आणि खड्डे भरणे.
  • रासायनिक खत वापरून खड्डे भरणे. अंतरमशागत करणे.
  • काटेरी झाडांचे कुंपण करायचे असल्यास ते करणे. (ऐच्छिक)
ब. शासन अनुदानित कामे –
  • खड्डे खोदणे.
  • कलमे लागवड करणे.
  • पिक संरक्षण नांग्या भरणे.
  • ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे इत्यादी कामे १०० टक्के राज्य शासन अनुदानावर केली जातील.



 फळबाग लागवड योजनेसाठी अनुदान वितरित करण्याचे निकष –

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास तीन वर्षात १०० टक्के अनुदान देय असेल. त्यामध्ये या तीन वर्षाच्या कालावधीत ५०:३०:२० या प्रमाणात अनुदान देय राहील. खालील तक्त्यात अनुदान विवरण देण्यात आलेले आहे

Ten Important Farm Machinery with Uses

  Ten Important Farm Machinery in India with Uses Plough : Tractor Ploughing is the most common and efficient farming practice. Plough is th...