भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना: महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना 2023..
भाऊसाहेब फुंडकर फळबाग फळबाग योजना 2022 अंमलबजावणी कार्यपद्धती : त्यामध्ये अर्ज केल्यापासून या योजनेच्या संपूर्ण अंमलबजावणी कश्याप्रकारे होते याची माहिती पाहणार आहोत. जसे कि योजनेत सहभागी होण्याची कार्यपद्धती, फळबाग लागवडीसाठी क्षेत्र मर्यादा किती, लाभार्थी पात्रतेचे निकष, फळबाग लागवड योजनेसाठी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावयाची कामे आणि शासन अनुदानित कामे कोणती, फळबाग लागवड योजनेसाठी अनुदान वितरित करण्याचे निकष, फळबाग योजना अंमलबजावणी कार्यपद्धती इत्यादी सर्व गोष्टींची माहिती पाहणार आहोत.
- महाराष्ट्रात सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजना राबविण्यात येत असून, या योजने अंतर्गत अर्थसहाय्य टप्प्याटप्प्याने दिले जाते.
- महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी ज्यांचे फळबाग लागवडीकरता दोन हेक्टर पर्यंत क्षेत्र मर्यादित आहे. ते शेतकरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत अनुदानास पात्र आहेत.
- महाराष्ट्रात ८० टक्के अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत आणि जॉब कार्ड नसल्यामुळे, ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरत नाहीत. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे निश्चित केले आहे.
- ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून पशुधन व पीक याबरोबरच फळबाग लागवडीला देखील सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे.
No comments:
Post a Comment