Blog Archive

Monday, 3 April 2023

शेवगा पावडर : बचतगटातील / महिलांसाठी उद्योग

 बचतगटातील (SHG) महिलांना, शेवगा पावडरचा चांगला उद्योग रता येईल. शेवगा लागवडीसोबत पानांची देखील विक्री करता येते किंवा शेतातच एक प्रक्रिया युनिट सुरू करता येते.

शेवगा पानांच्या पावडरचे (मोरिंगा पावडर) फायदे :

शेवग्याच्या शेंगांना इंग्लिश मध्ये ‘Drumstick tree’ असे म्हणतात. या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव ‘मोरिंगा ओलिफेरा’ (Moringa oleifera) असे आहे. शेवग्याच्या पानांची पावडर केली जाते आणि या पावडरला Moringa powder किंवा Drumstick leaves powder असेही म्हणतात. Horseradish tree, ben oil tree अशीही काही नावे आहेत. शेवग्याला हिंदी मध्ये ‘सहजन’ असे नाव आहे.

आपण महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा भारतातील लोक अगदी चवीने आणि वेगवेगळ्या पद्धतीने शेवग्याची भाजी किंवा शेवग्याची आमटी करून खातात. साऊथ इंडियन पदार्थातीळ सांबर मध्ये तर शेवग्याच्या शेंगा असतातच. आपल्याकडे ही वनस्पती अगदी सहज उपलब्ध होते. म्हणूनच आपण एक भाजी म्हणून शेवग्याचा वापर करतो. पण प्राचीन काळापासून माणूस या वनस्पतीचा औषधी उपयोग करत आला आहे. आधुनिक काळात अमेरिकेसारख्या देशात मोरिंगा पावडर भारतातून आयात केली जाते. तिकडे किंवा आपल्याकडेही शेवग्याला मोरिंगा सुपरफूड (Moringa superfood) असेही ओळखले जाते.

शेवगा किंवा मोरिंगा पावडर व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अमिनो असिड्स ने समृद्ध असते.
जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध (Moringa powder is Vitamins and Minerals rich)

हे संशोधनातून सिद्ध झाले आहे की मोरिंगा पावडरमध्ये संत्र्याच्या सात पट व्हिटॅमिन सी असते. गाजराच्या चार पट व्हिटॅमिन अ (vitamin A) असते. दुधाच्या चार पट कॅल्शिअम (calcium) असते. केळीच्या तीनपट पोटॅशियम असते. पालकाच्या पाऊण पट लोह (iron) असते. आणि दह्याच्या दुप्पट प्रथिने किंवा Proteins असतात. हे वाचल्यानंतर कुणीही समोर आलेली शेवग्याची भाजी, वरण, सांबर किंवा आमटी नाकारणार नाही. कारण इतकं पोषणतत्वे खचून भरलेली भाजी आपल्याकडे सहज मिळते. चला तर पाहूया या वनस्पतीचे आरोग्यासाठी होणारे फायदे.

नैसर्गिकरित्या वजन कमी करणारा पदार्थ – Moringa powder Best food for weight loss for male and female

शेवग्याच्या पानांमध्ये क्लोरोजनिक ऍसिड (Chlorogenic acid) हे antioxidents असते जे नैसर्गिकरित्या चरबी घटवण्याचे काम करते म्हणजेच Natural Fat Burner असते. हे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्याचे काम करते. शेवग्याचे नियमित सेवन वजन कमी करण्यात मदत करते.

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मोरिंगा पावडर Moringa powder benefits for male and female haircare

मोरिंगा पानांची पावडर मध्ये रक्त शुध्द करणारे घटक असतात. केस आणि अमिनो असिड्स (amino acids) आणि केरॅटीन प्रोटीन (Keratine proteine) असतात. या घटकांमुळे केस लांब आणि दाट होतात.

मोरिंगा पावडर पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते Moringa powder helps is Metabolism


मोरिंगा पावडर हे चयापचय क्रिया सुधारणारा आहार (Metabolism boosting diet) म्हणून ओळखले जाते. यामध्ये जे तंतुमय पदार्थ असतात ते पचन कार्याची गती वाढवतात. बद्धकोष्ठता कमी होते. पोटातील इन्फेक्शन पण या वनस्पतीचे सेवन केल्याने कमी होते.

मोरिंगा पावडर त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते Moringa powder keeps skin young and healthy

प्रदूषण, घाम, उष्णता यामुळे आपल्या त्वचेवर विविध जिवाणू विषाणू याची वाढ होते. त्यामुळे त्वचेचे सौंदर्य कमी होते. यात अँटीफंगल, अँटीबॅक्टरीअल अनो अँटिटॉक्सिक घटक असतात ते या जिवाणूंची वाढ प्रतिबंधित करतात. यामध्ये व्हिटॅमिन अ जाइत प्रमाणात असते. व्हिटॅमिन अ हा त्वचेला सुंदर ठेवणारा घटक आहे.

म्हणून भरपूर सौंदर्य प्रसाधनांमध्ये मोरिंगा पावडरचा उपयोग केला जातो. यामध्ये लोह असते जे रक्त शुद्ध करण्यास मदत करते. त्यामुळे पिंपल्स चा नाश होतो.

मोरिंगा पावडर लहान मुलांसाठी टॉनिक

शेवगा पावडर मध्ये भरपुर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असते. कॅल्शियम हे हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी आवश्यक असते. यामध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस पण असते जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. म्हणुन मोरिंगा पावडर लहान मुलांसाठी टॉनिक सारखे काम करते

रक्तातील साखर नियंत्रक मोरिंगा पावडर (Moringa powder controls Blood Sugar level )

मोरिंगा पावडरचे नियमित सेवन केल्याने शरीराला खूप फायदे होतात. आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत राहिल्याने एक दिवस त्याची परिणती मधुमेह होण्यात होते. मोरिंगा पावडर रेग्युलर सेवन केल्याने किंवा शेवग्याची भाजी आहारात ठेवल्याने रक्तातील साखर कमी होते. म्हणून मोरिंगा पावडर डायबेटीस नियंत्रक (Moringa powder diabetes controller) म्हणून वापरली जाते.गर्भवती महिलांसाठी फायदेशीर
हे पावडर गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन, मिनरल्स असतात ज्यामुळे गर्भाची हाडे निरोगी तयार होतात. महिलेलाही यातील कॅल्शियम, पोटॅशियम, लोह यांचा फायदा होतो. हे घटक आई आणि बाळ याना निरोगी ठेवण्यात सहकार्य करते.

प्रसुतीनंतर महिलांसाठी फायदेशीर Moringa powder benefits for female in pregnancy

प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर गर्भाशयाचे आरोग्य राखण्यात शेवगा किंवा मोरिंगा पावडर किंवा शेवग्याची भाजी खूप उपयोगी आहे. आणि हे दुभत्या मातांसाठी दूध वाढवण्यात मदत करते. प्रसुतीनंतर होणार त्रास कमी करण्यातही सहाय्य करते.

उच्च रक्तदाब कमी करते Moringa powder lowers blood pressure

मोरिंगा पावडर किंवा शेवग्याच्या शेंगांमध्ये पोटॅशियम खुप प्रमाणात असते. पोटॅशिअम हे उच्च रक्तदाब कमी करण्यात मदत करते. BP कमी करण्यासाठी हा एक चांगला, स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहे.









आशा प्रकारे आहारात समावेश करा

आपण शेवग्याचे आश्चर्यचकित करणारे गुणधर्म पाहिले आहेत. तुम्ही शेवग्याचे सेवन पुढीलप्रमाणे आपल्या आहारात करू शकता

महाराष्ट्रात शेवग्याच्या शेंगा भाजी मंडईत सर्रास उपलब्ध असतात. त्या विकत घेऊन तुम्ही शिजवलेली भाजी करू शकता. आमटी किंवा रस्सा भाजीही करता येईल. या शिजवलेल्या शेंगांच्या आतील भाग तुम्ही दातांनी खरडून खाल्ले तर तुम्हाला यातील सगळी पोषणतत्वे मिळतील.

शेवग्याचे सांबर किंवा आपल्या भाषेत वरण करून खावे. खूप स्वादिष्ट लागते.

शेवग्याच्या झाडाची ताजी पाने आणून त्यांचा ज्यूस करून पिता येईल.

ही पाने कोशिंबीर किंवा सलाडमध्ये सुद्धा टाकुन खाता येतील.

हे पावडर बनवून घरात ठेवून रोज सेवन करावे. ही पाने स्वच्छ कपड्यावर हवेशीर खोलीत किंवा सावलीत काहीतरी जाळीदार झाकून वाळवावे लागतील. थेट सूर्यप्रकाशात वाळवू नये. ही पाने वाळायला तीन ते चार दिवस लागतात. वाळल्यानंतर ती मिक्सरमध्ये भुकटी करून हवाबंद डब्यात भरून ठेवावे.

हे मोरिंगा पावडर तुम्ही सलाडमध्ये, भाजीमध्ये किंवा कोमट पाण्यात सेवन करू शकता. 

.शेवग्याच्या वाळलेल्या पानामध्ये ताज्या पानांपेक्षा अधिक पोषकतत्वे असतात आणि वापरण्यास अगदी सहज व सोपे जाते. शेवगा पानांच्या (Moringa Leaves) पावडरची कॅप्सुलदेखील (Moringa Powder Capsule) बाजारात उपलब्ध आहे. बचतगटातील (SHG) महिलांना, शेवगा पावडरचा चांगला उद्योग रता येईल. शेवगा लागवडीसोबत पानांची देखील विक्री करता येते किंवा शेतातच एक प्रक्रिया युनिट सुरू करता येते.  शेवगा वनस्पतीचा प्रत्येक भाग हा शरीरासाठी खूप गुणकारी आहे. आहाराबरोबरच शेवग्याचा वापर पाणी शुद्धीकरणासाठी केला जातो. विदेशात शेवग्याच्या पानांपासून तयार केलेल्या भुकटीचा विविध प्रकारे वापर केला जातो. अशी भुकटीला भावही चांगला मिळतो. शेवग्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, मॅग्नेशिअम, जीवनसत्त्व अ, सी व बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात आढळतात. 

शेवग्याच्या पानाची पावडर तयार करण्याची घरगुती पद्धत 

- शेवग्याची ताजी पाने घेऊन चांगल्या प्रकारे धुवून सावलीत वाळवावीत. पाने सूर्यप्रकाशात वाळवल्यास त्यातील काही प्रमाणात पोषक तत्त्वांचा ऱ्हास होतो.  

- शेवग्याची पाने वाळवताना जाळीदार कापडाने झाकावीत. पाने पूर्णतः वाळण्यासाठी किमान तीन दिवस लागतात.   

- पाने पूर्णतः वाळल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर करावी. तयार पावडर  हवाबंद डब्यात साठवावी, 

फायदे काय आहेत?

शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम व ॲंटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळतात.   

१०० ग्रॅम भुकटीत दुधापेक्षा १७ पट अधिक कॅल्शियम व पालकापेक्षा २५ पट अधिक लोह असते. 

गाजरापेक्षा १० पट अधिक बीटा-कॅरोटीन असते. हे बीटा कॅरोटिन डोळे, त्वचा व रोगप्रतिकारतेसाठी फायद्याचे असते.   

शेवग्याच्या पानांमध्ये क्लोरजेनिक ॲसिड असून, ते नैसर्गिकरीत्या चरबी कमी करण्याचे काम करते. 

शरीरातील जमा होत राहणाऱ्या विषारी घटकाचे विरेचन करण्याचे काम शेवग्याच्या पानांची भुकटी करते. 

शेवगा हा ॲमिनो ॲसिडचा उत्तम स्रोत असून, त्यामुळे केरेटीन नावाचे प्रोटीन तयार होण्यास मदत होते. या प्रोटीनमुळे केस लांब व दाट होतात.   

या भुकटीत असलेल्या तंतूमय पदार्थांमुळे पचनक्षमता सुधारते, तसेच बद्धकोष्टता कमी होते. 

शेवग्यात ॲमिनो ॲसिड ट्रिप्तोफन असून, त्यामुळे मेलाटोनीन हे संप्रेरक तयार होण्यास मदत होते. या सर्व औषधी गुणांमुळे शेवगा ही आरोग्यदायी वनस्पती म्हणून ओळखली जाते.      


No comments:

Post a Comment

Ten Important Farm Machinery with Uses

  Ten Important Farm Machinery in India with Uses Plough : Tractor Ploughing is the most common and efficient farming practice. Plough is th...