Wednesday, 12 April 2023

राजमा : महाराष्ट्रातील रब्बीच्या हंगामात अधिकचे उत्पन्न देणारे शेंगावर्गीय पिक

राजमा : महाराष्ट्रातील रब्बीच्या हंगामात अधिकचे उत्पन्न देणारे शेंगावर्गीय पिक


राजमा हे उष्ण कटिबंध प्रदेशात मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. आफ्रिका, युरोप आणि अमेरिका येथे याला खूप मोठया प्रमाणात डाळ म्हणून खाल्या जाते. भारतात राजमा हा उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आणि आंध्र प्रदेश मध्ये पिकवला जातो.

राजमा हे थंड हवामानात येणारे पीक आहे.हे पिक साधारण 75 ते 85 दिवसात तयार होते. त्यामुळे पाण्याची मुबलक प्रमाणात व्यवस्था असल्यास हिवाळ्यामध्ये राजमा आणि उन्हाळ्यामध्ये भुईमुग या पिकास अवलंब करता येतो.राजमा हे पिकाचा वेल मुगासारखे आहे. त्याची उंची गुडघ्या इतकी असते. याचे दाणे घेवडा व काही प्रमाणात येरंड्यासारखी दिसतात. या पिकापासून मिळणाऱ्या दाण्यांचा हॉटेलात भाजीसाठी वापर केला जातो. त्यातून प्रोटीन मोठ्या प्रमाणात मिळतात, त्यामुळे आरोग्यासाठी ते चांगले आहे. याच्या कोवळ्या शेंगाचीही भाजी तयार होते. त्यामुळे बाजारात याला चांगली मागणी आहे. 



लाल रंगाची थोडी गुलाबी असलेली ही किडनी बीन्स (kidney beans) आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यवर्धक आहे. या बियांची भाजी मोठया आवडीने आपल्याकडे खाल्ली जाते व तितकेच red kidney beans चे आरोग्यासाठी फायदे सुद्धा आहेत. राजमा लाच आपल्या मराठी भाषेत घेवडा असे म्‍हणतात. याला किडनी बीन्स असे म्हणतात. कारण याचा आकार हा किडनी सारखा आहे.


राजमा चे प्रकार :

1) हलका लाल राजमा

हा राजमा बाकी राजमा पेक्षा आकारात थोडा मोठा असतो याला शिजायला 90 ते 120 मिनिट लागतात.

2) काळा राजमा

हा मिडीयम आकार असलेला काळा रंगाचा चा राजमा आहे. हा राजमा खायला गोड असतो

3) गर्ध लाल राजमा

हा राजमा आकारामध्ये थोडा मोठा असतो. याचा वापर जास्त सूप तयार करण्यासाठी केला जातो.

4) नेवी बीन्स

हा राजमा छोटा असतो. याला शिजायला 90 ते 120 मिनिटं लागतात. हा राजमा पण आकाराने छोटा असतो. याला शिजायला फक्त 60 मिनिटे लागतात. लवकर राजमा तयार करायचा असेल तर हा राजमा जास्त वापरला जातो.

5) पिटो राजमा

हा राजमा जास्त प्रमाणात रशिया मध्ये खाल्ला जातो. याचा आकार हा मिडीयम असतो.



जमिनीची निवड व मशागत :

राजमा या पिकास मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिनी सर्वोत्तम ठरते. चोपण अथवा पाणी साचणारी जमीन या पिकाकरीत निवडू नये. खरीप हंगामातील पिकांची कापणी झाल्याबरोबर राजमा या पिकाचे जास्त उत्पादन मिळण्याकरिता जमीन लोखंडी नागराने किंवा ट्रॅक्टरद्वारे नांगरून नंतर वखराच्या दोन- तीन पाळ्या देवून जमीन भुसभुशीत करावी.

योग्य जातीची निवड :

वेळेवर म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी करिता व्हीएल 63, एचयुआर 15, पीडिआर 14, एचयुआर 137 या जातीची निवड करावी. उशीरा पेरणी करिता एचयुआर 87 व एचयुआर 137 ह्या जातीची लागवड करावी.

पेरणी :

या पिकाची पेरणी वाणानुसार करावी एचयुआर 15 आणि पीडीआर 14 हे वाण असल्यास दोन ओळीतील अंतर 30 से.मी. त्याचप्रमाणे दोन रोपातील अंतर 10 से.मी. ठेवावे. आणि व्हीएल 63 आणि एचयुआर 137 या वाणाकरीता दोन ओळीतील अंतर 45 से.मी. तर दोन झाडामधील अंतर 10 सेमी. ठेवावे लागणार आहे.


खताच्या मात्रा आणि पाण्याचे नियोजन :





राजमा या पिकाचे भरपूर उत्पादन करिता पेरणीच्या वेळेस 90 किलो नत्र आणि 60 किलो स्फुरद या प्रमाणात रासायनिक खताच्या मात्रा दयाव्यात . पिक फुलोऱ्यात असताना 2 टक्के युरीयाची फवारणी केल्यास उत्पन्नात वाढ होते. राजमा या पिकाला साधारण 7 ते 9 पाळ्या द्यावा लागतात. पेरणी आगोदर पाणी देवून वाफसा आल्यानंतर पेरणी करावी. पेरणीनंतर पून्हा पाणी द्यावे. बियाण्यावर मातीचा कडक थर जमा झाल्यास 3 ते 4 दिवसांन पाणी द्यावे यामुळे बियाणे उगवण्यास मदत होते. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 10 ते 15 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या घालाव्या लागणार आहे.

राजमा हे एकूण ८० दिवसांचे पीक असून ६५ दिवसात शेंगा (legumes) लागतात. हिरव्या शेंगांनाही स्थानिक बाजारात उचल मिळते. 

बियाण्‍याचे प्रमाण :

प्रति हेक्‍टरी 40 किलो बियाणे लागते. टोकन पध्‍दतीने लागवड केल्‍यास हेक्‍टरी 25 ते 30 किलो बी लागते.

उत्‍पादन :

श्रावण घेवडयाचे हेक्‍टरी उत्‍पादन 27 क्विंटलपर्यंत घेता येते.






काळ्या हळदीची शेती : शेतकऱ्यांसाठी एक शाश्वत उत्पन्नाचे साधन

  काळ्या हळदीची शेती : शेतकऱ्यांसाठी एक शाश्वत उत्पन्नाचे  साधन



काळी हळद शास्त्रीय नाव:

काळ्या हळदीला वनस्पतिशास्त्रात Curcuma cassia आणि इंग्रजीत black jedori म्हणतात. काळ्या हळदीचे कंद किंवा राइझोम सुकल्यावर दंडगोलाकार, गडद रंगाचे कठीण स्फटिक बनतात. राइझोमचा रंग काळा असतो.हळदीचे मुळ म्हणजेच कांडी ही आतून काळी किंवा वांग्याच्या रंगाचे असते. त्याची वनस्पती स्टेमलेस हर्बेसियस आणि 30 ते 60 सेमी उंच आहे. उंच उगवते. पाने वरच्या पृष्ठभागावर निळसर-जांभळ्या मधोमध शिरा असलेली रुंद लॅन्सोलेट आहेत. फुले गुलाबी रंगाची असतात आणि काठावर कोटिलेडॉन असतात.




काळ्या हळदीचा उपयोग:

काळ्या हळदीमध्ये खूप सारे औषधी गुण आहेत. यामुळे ही हळद सामान्य हळदीपेक्षा जास्त किंमती आहे. याची शेती करून जास्तीचा फायदा कमविता येईल. काळ्या हळदीचा वापर औषधे बनविण्यासाठी केला जातो. कॉस्मेटिक उत्पादने बनविण्यासाठी ही हळद वापरतात.ही हळद न्युमोनिया, खोकला, ताप, अस्थमा आदी आजारांवर गुणकारी आहे. याशिवाय या हळदीचा लेप डोक्यावर लावल्यास मायग्रेनपासून दिलासा मिळतो. ल्यूकोडर्मा, मिर्गी सारख्या रोगांवरही ही हळद उपायकारक आहे. सौदर्य वाढविण्यासाठी देखील वापरतात.काळी हळद आपल्या चमत्कारिक गुणधर्मामुळे देश-विदेशात खूप प्रसिद्ध आहे. मजबूत प्रतिजैविक गुणधर्म असलेल्या औषधी वनस्पती म्हणून काळी हळद वापरली जाते. काळ्या हळदीचा उपयोग जखमा, मोच, त्वचा रोग, पचन आणि यकृताच्या समस्या बरे करण्यासाठी केला जातो. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

हवामान:

काळ्या हळदीच्या लागवडीसाठी हवामान अनुकूल आहे. त्यासाठी १५ ते ४० अंश सेंटीग्रेड तापमान योग्य मानले जाते. त्याची झाडे दंव देखील सहन करतात आणि प्रतिकूल हवामानातही त्यांचे अनुकूलन टिकवून ठेवतात.




जमिन :

 त्याच्या लागवडीसाठी वालुकामय, चिकणमाती, मटियार, मध्यम जमीन ज्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली आहे. याउलट, चिकणमाती, मिश्र मातीत कंद वाढत नाहीत. त्याच्या लागवडीसाठी, जमिनीत भरपूर जीवाश्म असावेत. पाणी साचलेल्या किंवा कमी सुपीक जमिनीत त्याची लागवड केली जात नाही. त्याच्या लागवडीसाठी जमिनीचा pH. 5 ते 7 च्या दरम्यान असावे.

 लागवडीची तयारी :

सर्व प्रथम, जमिनीच्या वळणाच्या नांगराने शेताची खोल नांगरणी करा. त्यानंतर सूर्यप्रकाश मिळण्यासाठी शेत काही दिवस मोकळे सोडावे. त्यानंतर शेतात योग्य प्रमाणात जुने शेणखत टाकून ते जमिनीत चांगले मिसळावे. खत जमिनीत मिसळण्यासाठी शेताची दोन ते तीन तिरपी करा. नांगरणीनंतर शेतात पाणी टाकून ते स्वच्छ करावे. नांगरणीनंतर जेव्हा शेताची माती वरून कोरडी दिसू लागते तेव्हा पुन्हा शेतात नांगरणी केल्यावर त्यामध्ये रोटाव्हेटर चालवून माती बारीक करावी. त्यानंतर फील्ड लेव्हल करा.




पेरणी काळ :

काळ्या हळदीच्या पेरणीसाठी योग्य काळ हा पावसाळा मानला जातो. पेरणीसाठी सर्वोत्तम वेळ जून-जुलै आहे. मात्र, सिंचनाचे साधन असल्यास मे महिन्यातही पेरणी करता येते.

 बियांचे प्रमाण:

काळ्या हळदीच्या लागवडीसाठी हेक्टरी 20 क्विंटल कंद आवश्यक आहेत. त्याच्या कंदांना लावणीपूर्वी योग्य प्रमाणात बाविस्टिनची प्रक्रिया करावी. कंद बाविस्टिनच्या 2% द्रावणात 15 ते 20 मिनिटे बुडवून ठेवावेत कारण त्याच्या लागवडीत बियाण्यांवर जास्त खर्च होतो.

 पेरण्याची/लावणीची पद्धत :

काळ्या हळदीचे कंद ओळीत लावले जातात. प्रत्येक ओळीत दीड ते दोन फूट अंतर असावे. ओळीत लागवड करावयाच्या कंदांमधील अंतर सुमारे 20 ते 25 सें.मी. पाहिजे कंदांची लागवड जमिनीत 7 सें.मी. खोलवर केले पाहिजे. रोपाच्या स्वरूपात, त्याच्या लागवडीच्या कड्यांमध्ये एक ते दीड फूट अंतर असावे. रिजवरील वनस्पतींमधील अंतर 25 ते 30 सें.मी. पाहिजे प्रत्येक मेंढ्याची रुंदी सुमारे अर्धा फूट ठेवावी.

 खत प्रमाण :

शेत तयार करताना जुने शेणखत मातीत मिसळून झाडांना द्यावे. एकरी 10 ते 12 टन कुजलेले शेण टाकावे. घरी तयार केलेले जीवामृत झाडांना सिंचनासोबत द्यावे.

 कापणी :

काळ्या हळदीचे पीक लावणीपासून २५० दिवसांनी काढणीसाठी तयार होते. कंद खोदण्याचे काम जानेवारी-मार्चमध्ये केले जाते.

उत्पन्न :

त्याची योग्य पद्धतीने लागवड केल्यास एका एकरात सुमारे 50-60 क्विंटल कच्ची हळद म्हणजेच सुमारे 12-15 क्विंटल कोरडी हळद मिळू शकते. 

नफा :

काळी हळद बाजारात सहज 500 रुपयांना विकली जाते.काळी हळद बाजारात फक्त 500 रुपयांना विकली गेली तर 15 क्विंटलमध्ये तुम्हाला 7.5 लाख रुपयांचा नफा मिळेल. बियाणे, नांगरणी, सिंचन, खोदकाम यासाठी तुम्ही अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च केला तरीही तुम्हाला 5 लाख रुपयांचा नफा मिळेल.


 



Tuesday, 11 April 2023

चिंच प्रक्रिया उद्योग व त्यासाठी लागणारे बहुपयोगी यंत्रे

 

चिंच प्रक्रिया उद्योग व  त्यासाठी लागणारे बहुपयोगी यंत्रे


प्रास्ताविक :

चिंच हे टॅमरिंडस इंडिका झाडाचे फळ आहे, त्याचा उपयोग खाद्य पदार्थाची चव वाढविणारा घटक किंवा अमचूर सारखा ॲसिड्युलेंट म्हणून केला जातो.चिंच हा कॅसलॅपीनिआसी कुटुंबातील झाड आहे. हे उष्ण कटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात मोठ्याप्रमाणात वाढते. हिमालय आणि पश्चिम कोरडे प्रदेश वगळता देशातील सर्व राज्यात याची लागवड केली जाते. चिंचेच्या झाडाचा आकार हा मोठा असतो. हा हळू वाढणारा आणि सदाबहार वृक्ष आहे. त्याच्या खोडाचा व्यास १.५ – २ मीटर पर्यंत असतो. तो २०-३० मीटर उंच वाढू शकतो. चिंचेच्या फळांची लांबी साधारणतः ५ ते १४ से.मी. आणि २ सें.मी. रुंद असते. हा एक शेंग प्रकारातील फळ आहे. ज्याला कडक, तपकिरी रंगाचा कवच आहे. फळे पूर्णपणे पिकल्यावर कवच ठिसूळ आणि सहज मोडणारे असते. शेंगामध्ये १ ते १२ मोठे सपाट चकचकीत तपकिरी रंगाच्या बिया असतात.चिंच अलिकडे इंडोनेशिया, तैवान आणि फिलिपिन्समध्ये बोनसाई (कुंड्यामध्ये उगवलेले सजावटीचे झाड किंवा झुडूप कृत्रिमरित्या लहान आकार असलेले झाड) म्हणून लोकप्रिय झाले आहे



चिंचेच्या झाडाचा प्रत्येक भाग, विशेषतः फळ समाजासाठी फायदेशीर आहे. चटणी, लोणचे, केच अप, सॉस, आईस्क्रिम, सरबत आणि लोणच्यामध्ये चिंच फळाचा लगदा महत्वाचा घटक आहे. चिंच ही आयुर्वेद व औषधी प्रणालीमध्ये मोठ्याप्रमाणात वापरली जाते. चिंचेचे पदार्थ हे तापामध्ये शरीर थंड ठेवणारे घटक व औषध म्हणून सर्वत्र ओळखले जातात. चिंचेच्या फळांच्या लगद्याचा उपयोग पाचन, पित्त विकारांवर उपाय म्हणून, उन्हाची झळ, धोत्र्याच्या फुलाची विषबाधा आणि मादक नशा कमी करण्यासाठी केला जातो. चिंचेचे पेय जगभरात लोकप्रिय आहे. मसालेदार चिंचेचे पेय बनविण्याचे सूत्र भारतात विकसित केले गेले आहेत.

चिंचांचा उपयोग :

चिंचांची उत्तम चटणी बनवतात. सॉस व सरबत बनवतात, युरोप, अमेरिकेत चिंचेतील आंबट रसायन वापरून उत्तम आरोग्यदायी पेय बनवितात. कैरीच्या पन्ह्याप्रमाणे चिंचेपासून पन्हे बनवतात. चटकदार भेळ, पाणीपुरी यांसाठी चिंचेचे पाणी वापरतात. याशिवाय अनेक खाद्यपदार्थात चिंचेचा वापर करण्यात येतो. अनेक औषधात चिंचांचा उपयोग करतात. चिंचेची पावडर बनवतात. तिचा उपयोग गोळ्या, बिस्किटे व चॉकलेटमध्ये करतात.

साखर किंवा गूळ मिसळून चिंच खातात. चिंचा वाळल्यावर हाताने सहज सोलल्या जातात. सोलल्यावर बुटुकातून चिंचोका (बी) बाहेर निघतो. तो चवीला तुरट असतो. हा चिंचोका बहुगुणी आहे. त्यात पेक्टिन नावाचे द्रव्य असते. त्याचा जेली व मुरांबा तयार करण्यासाठी उपयोग केला जातो.

चिंचोक्यात पेक्टिन बरोबरच स्टार्च व टॅनिन असते. रानावनात राहणारे आदिवासी चिंचोक्याच्या पिठाची भाकरी करून खातात. तसेच त्या पिठाची खळही बनवितात. चिंचोके भाजून किंवा उकडून खातात. गुरांच्या खड्यात चिंचोक्याच्या पीठाचा वापर करतात. लोकर व रेशीम, इतर धाग्यांचे कापड विणताना चिंचोक्याच्या टरफरलाचा उपयोग केला जातो. घोंगड्यांना खळ देण्यासाठी चिचोक्याच्या टरफलाचा उपयोग केला जातो. घोंगड्यांना खळ देण्यासाठी चिंचोक्यांचा उपयोग केला जातो.

चिंचेचे अनेक औद्योगिक वापरही आहेत. चिंचोके भाजून त्यापासून केलेल्या पिठाचा वापर ब्रेड, बिस्किटामध्येही केला जातो. चिंचोक्याच्या वापर स्टार्च निर्मितीसाठी करतात. स्टार्चचा वापर सुती कापड व घोगड्यांना कडकपणा आणण्यासाठी केला जातो. कातडी कमावण्याच्या उद्योगात चिंचोक्यांच्या काळपट तांबडसर टरफलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच चिंचेचा पाला जनावरे आवडीने खातात. जनावरांचे खाद्य म्हणूनच याचा वापर केला जातो.

चिंचेचे औषधी गुणधर्म :

चिंचफळातला गर रोचक, दाहशामक व रक्तपित्तशामक असतो. लघवीच्या विकारावर चिंचेच्या टरफलांची राख देतात. फुले रक्तसंग्राहक आहेत. चिंचपन्हे पित्त व इतर ज्वरात होणाऱ्या जुलाबावर देतात. लचक-मुरगळा, व्रण बरा होण्यासाठी त्यावर चिंचपाला ठेचून बांधतात. चिंचपाला सारक, रूचकर व रक्तदोषनाशक असतो. त्यात टार्टरिक अॅसिड व क्षारादी औषधी गुणधर्म असतात. पाळीव जनावरांची पचनक्रिया बिघडली असता त्यास चिंचपाला व लिंबपाला मिश्रित चारा खाऊ घालतात.

गुरांची मान व पाय सुजीवर चिंचपाला व वारूळाची माती उकळत्या पाण्यात कढवून त्याचा लेप करतात. पोटात कळा येत असतील, पातळ जुलाब होत असतील तर भाताच्या पेजेत चिंचपाला वाटून ते मिश्रण औषधासारखे द्यावे. त्याने अतिसार थांबतात, असे वैद्यराज सांगतात. पाल्याच्या रसात तुरटी उगाळून त्यात कापडाची पट्टी भिजवून डोळ्यावर बांधल्यास नेत्रविकास बरा होतो. चिंचेच्या कोवळ्या पानांची चटणी व कोशिंबीर फारच रूचकर लागते. चटणीत चवीला गुळ, हिंग व तिखट किंवा हिरवी मिरची वाटून टाकतात.

चिंचफळातल्या चिंलोक्याचेही अनेक औषधी उपयोग आपल्या प्राचीन ग्रंथपुराणात सांगितले आहेत. भोजनानंतर मुखशुध्दीसाठी चिंचोका वापरतात. भाजलेल्या चिंचोक्याची टरफले काढून सुपारीसारखे चूर्ण किंवा तुकडे, भाजलेल्या खारकांचे तुकडे तसेच मीठ व लिंबयुक्त ओवा टाकतात. ही सुपारी चवदार व पाचक असते. चिंचोके वातहारक, रक्तदोषनिवारक व कफनाशक असतात.साल काढलेल्या, भाजलेल्या चिंचोक्याचे चूर्णामध्ये मध व तूपातून चाटण केल्यास कफ व कफाबरोबर रक्त पडण्याचे थांबते. पडजीभ आल्यास चिंचोका थंड पाण्यात उगाळून त्याचा लेप करतात. चिंचोका चूर्ण व हळद थंड पाण्यात मिसळून घेतल्यास गोवर व कांजिण्यात आराम पडतो. चिंचोके कुटून व यंत्रदाबानं चिंचोक्याचे तेल काढतात. ते शक्तीवर्धक असतं. चिंचपाला, चिंचफळ, चिंचोके व चिंचसाल यांचे अनेक औषधी उपयोग आहेत.


चिंच प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे बहुपयोगी यंत्रे


1.  चिंचेचे टरफल काढणारे यंत्र (डिहलिंग) : 



चिंचेच्या प्रक्रियेमध्ये टरफल काढण्यासाठी मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता भासते. वाळलेल्या चिंचेचे टरफल वेगळे करण्यासाठी यंत्र बाजारात उपलब्ध आहे.

या यंत्राला २६० व्होल्ट इतक्या उर्जेची आवश्यकता असून, ते सिंगल फेज किंवा थ्री फेज अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध आहे. वजन सुमारे ६० ते ७० किलो आहे. हे यंत्र एक व्यक्ती चालवू शकते. ४०० किलो प्रति तास क्षमतेच्या यंत्राची किंमत ४० हजार रुपयांपासून पुढे आहे.


2. बिया वेगळे करणारे यंत्र (डिसिडींग):



या यंत्रामध्ये हळू फिरणारे दोन स्टेनलेस स्टीलचे रोलर असतात. एक स्थिर बार (छोटा हातोडा) असतो. चिंच स्टेनलेस स्टीलच्या रोलरमध्ये घातल्यानंतर आतील तीक्ष्ण ब्लेडमुळे उभी कापली जाते. रोलर फिरत असतान त्यावर लावलेला बार दाबला जातो. त्यामुळे चिंचेतील बिया बाहेर टाकल्या जातात. चिंच पुढील बाजूने बाहेर काढली जाते. सुट्या झालेल्या चिंचेच्या बिया काढून बादलीमध्ये साठवल्या जातात. बिया विरहित चिंचा ट्रेमध्ये जमा केल्या जातात.

एक व्यक्ती ताशी ४० ते ५० किलो चिंचाच्या बिया काढू शकतो. या यंत्रासाठी ३ एचपी विद्यूत मोटार लागते. त्यातही सिंगल हेड व डबल हेड असे दोन प्रकार उपलब्ध आहेत. थ्री फेजवर चालणाऱ्या या यंत्रासाठी ४ फूट बाय ४ फूट जागा पुरेशी असून, वजन ८० ते ९० किलो असते.

3. उष्णतारोधक साठवण टाकी (इन्सुलेटेड स्टोरेज टॅंक):




संपूर्णपणे स्टेनलेस स्टिलपासून बनलेल्या या उष्णतारोधक टाकीचे उभे आणि आडवे असे दोन प्रकार आहेत.त्यात दोन थर असून बाह्य वातावरणापासून आतील तापमान कमी किंवा अधिक ठेवता येते. प्रामुख्याने याचा वापर शीतकरणासाठी केला जातो.

या यंत्राची क्षमता १००० लिटर व त्यापेक्षा अधिक असते. त्यानुसार त्याच्या किंमती १ लाख रुपयांपासून पुढे आहेत. साध्या टाक्यांच्या तुलनेमध्ये गराची टिकवणक्षमता यात अधिक असते. प्रत्येक वापराआधी टाकी चांगल्या प्रकारे धुवून घेणे गरजेचे असते

4. चिंचेपासून गर काढणारे यंत्र (पल्पर):


मसाला उद्योगासाठी पेस्ट, साॅस,  ज्यूस, प्युरी अशा प्रक्रिया पदार्थासाठी चिंचेच्या गराची आवश्यकता असते. गर काढण्यासाठी पुर्णपणे स्वयंचलीत यंत्र उपलब्ध आहे. टरफल काढलेली चिंच किचिंत ओलसर करुन फीड हॉपरमध्ये टाकली जाते. आतील फीड रोलर्सच्या साह्याने चिंच फिरवली जाते. ब्लेडने चिंच कापून एकमेकांविरुद्ध दिशेने फिरणाऱ्या दोन रोलर्समध्ये चिंचेचा गर घट्ट दाबला जात एका भांड्यामध्ये जमा होतो. चिंचेच्या बिया व तंतुमय भाग रोलर्समधून पुढील बाजूला ढकलला जातो.

सिंगल फेजवर चालणाऱ्या या यंत्रासाठी १ व ३ एचपी क्षमतेची मोटार लागते.  २२० व्होल्ट ऊर्जेवर चालणाऱ्या यंत्रापासून एका मनुष्याच्या मदतीने प्रति तास १०० ते १५० किलो चिंच गर वेगळा केला जातो. त्याचे वजन ४० ते ५० किलो आहे. क्षमतेनुसार यंत्राची किंमत ७० हजार रुपयांपासून पुढे आहे.



5. गर भरणी यंत्र:




हे यंत्र गर, चटणी, साॅस, जॅम, प्युरी, सीरप, लस्सी, श्रीखंड इ. पदार्थ पाऊच, बाटल्या किंवा कपामध्ये भरण्यासाठी वापरतात. हाॅपरमधून प्युरी न्युमॅटिक प्रेशर फिंलीगकडे पाठवली जाते. तेथे त्यावर दाब दिला जाऊन वजन किंवा आकारमानाप्रमाणे योग्य तेवढा भाग बाटलीमध्ये भरला जातो.

अचूक वजनासाठी यामध्ये स्क्रू स्टाॅप कॅलिब्रेटेड स्केल असते. यात आकारमानानुसार ५० मिली ते १००० मिलीपर्यंत गर किंवा द्रव भरता येतो. याद्वारे एक मिनिटामध्ये १५ बाटल्या भरता येतात. संपुर्ण स्वयंचलीत यंत्राची क्षमता ६०० लिटर प्रति तास असून, वजन ६५ किलो आहे. किंमत ८० हजार रुपयांच्यापुढे आहे.

यात माणसांद्वारे चालवण्याचे यंत्रही उपलब्ध असून, त्याच्या किंमती २० हजार रुपयांपासून पुढे आहे. यंत्राला २३० व्होल्ट ऊर्जा लागते. त्याची दाब रचना ०.४ ते ०.६ एमपीए आहे. याद्वारे आपणास १० मिली पासून ते १००० मिली पर्यंत बाटल्या भरता येतात. यंत्राचे वजन सुमारे ४० किलो आहे.

6. बाष्पीभवन किटली (स्टीम जॅकेटेड कॅटल) :



चिंचेचा गर गरम करण्यासाठी व बाष्पीभवनाद्वारे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी या यंत्राचा वापर होतो. त्याच प्रमाणे एक समान उष्णता आणि वाफेद्वारे चिचेंचे निर्जंतुकीकरणही केले जात असल्याने गर अधिक काळ टिकतो. या किटलीमध्ये अंतर्गंत भाग आणि बाह्य जॅकेट असे दोन भाग असतात. बाहेरून जोडलेल्या बॉयलरद्वारे आतील पोकळ भागात वाफ सोडली जाते. वाफ नियंत्रित ठेवण्यासाठी प्रेशर गेज आणि सेफ्टी वॉल्व असतात.

किटली ही एसडब्ल्यूजी स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली असते. या किटल्या आपल्या आवश्यकतेनुसार ५० लिटरपासून १००० लिटर प्रति तास क्षमतेच्या उपलब्ध आहेत. या किटलीला १ एचपी क्षमतेची विद्यूत मोटार जोडलेली असते. २२० होल्ट्स, थ्री फेजवर हे यंत्र चालते. अर्ध स्वयंचलीत यंत्र स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असते. त्याची किंमत ५० ते ६० हजार रुपयांपासून पुढे आहे.

7. चिंचेची भुकटी करणारे यंत्र  :



विविध मसाले किंवा प्रक्रिया पदार्थांमध्ये चिंचेच्या भुकटीचा वापर केला जातो. यासाठी बिया काढलेली चिंच उन्हामध्ये ८ ते १० दिवस वाळवून, भुकटी करणाऱ्या यंत्राद्वारे दळून घेतली जाते.

हे अर्ध स्वयंचलित पल्व्हरायझर पुर्णपणे स्टेनलेस स्ट्रीलचे बनवले जाते. २४० होल्ट ऊर्जा, सिंगल फेजवर चालणाऱ्या या यंत्राची क्षमता १० ते २५० किलो प्रति तास आहे. या यंत्रासोबत १० किलोची स्टीलची साठवणूक टाकी खालील बाजूला जोडलेली असते. या पल्व्हरायजरची किंमत ३५ हजार रुपये आहे. हे बहुपयोगी यंत्र असून, त्यात चिंच भुकटी सोबत सर्व प्रकारचे मसाले, डाळी, गहू, तांदूळ, बाजरी, मका, नाचणी बारीक करु शकतो.

8.चिंचेचे ठोकळे :



पारंपरिक पद्धतीमध्ये चिंचेचे गोळे बनवून ते साठवले जातात. मात्र, अलिकडे यंत्राच्या साह्याने चिंचेचे साधारण अर्धा किलो वजनाचे ठोकळे बनवले जातात. बिया काढलेल्या या चिंचेच्या ठोकळ्यापासून विविध प्रक्रिया पदार्थ तयार करणे सोपे पडते.  




चिंचेचा ठोकळा बनवणारी यंत्रे स्वयंचलीत व मॅन्युअली अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहेत. यात ५०० ग्रॅम क्षमतेच्या साच्यामध्ये बिया विरहित चिंच टाकली जाते. त्यावर हायड्रॉलिक पद्धतीने दाब टाकला जातो. थ्री फेज, २२० ते २४० व्होल्टवर चालणाऱ्या यंत्राची क्षमता ताशी २०० किलो आहे. यामध्ये मनुष्यबळावर चालणारे यंत्रही उपलब्ध आहे


पांढऱ्या जांभळाची शेती

 पांढऱ्या जांभळाची शेती 


शास्त्रीय माहिती :

शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाच्या जांभळाचे शास्त्रीय नाव ‘सायझिजियम क्युमिनी’ (Syzygium cumini) असे आहे. ‘मिरटशिए’ नावाच्या कुळातील हे जांभूळ रानमेवा प्रकारात मोडते.हे जांभूळ प्रामुख्याने दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियामध्ये आढळते. पांढऱ्या रंगाच्या जांभळाची रोपे ओडिशात मिळतात.



जमिन:

पांढऱ्या जांभळाची झाडे पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये वाढतात. गायरानाच्या हलक्या व पडिक जमिनीपासून ते सुपीक, मध्यम काळय़ा आणि माळाच्या जमिनीत ही झाडे चांगली वाढतात. . कमी खर्चात, कमी पाण्यात आणि कमी औषधामध्ये हे फळपीक पदरात पडते. फळमाशी आणि खोड अळी हे झाडांचे शत्रू आहेत. त्यापासून झाडाचे संरक्षण करण्यासाठीही जास्त काही करावे लागत नाही. 

हवामान: 

माफक तापमान असलेले वातावरण ही झाडे वाढायला पोषक ठरते.




औषधी  उपयोग

जांभूळ हे तर औषधी गुणधर्मानी युक्त फळ असल्यामुळे त्याचे महत्त्व काही औरच असते. पांढऱ्या रंगाच्या जांभळाचे महत्त्व पारंपरिक जांभळाप्रमाणे आणखी वैशिष्टय़पूर्ण ठरते. आंबट, तुरट, मधूर, रसाळ आणि गरदार अशा या फळामध्ये ‘व्हिटामिन सी’ २२ टक्के तर’’व्हिटामिन ए’ ११ टक्के यासारखे औषधी गुणधर्माचे विविध उपयुक्त घटक आहेत. जांभूळ मधुमेहावर विशेष गुणकारी मानला जातो. जांभळाच्या बियाणांचे चुर्ण मधुमेहावरील उत्तम औषध ठरते. जांभूळ रक्त शुध्द करते. यकृत मजबूत होते. मूत्राशयासारखे आजारही नाहीसे करते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप व अन्य उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभूळ पाचक आहे. जांभूळ झाडाची पाने शरीराच्या स्नायूंचे दुखरेपण कमी करण्यास मदत करतात. साधारणपणे १२ मीटर उंचीच्या एका झाडावर ७०० किलोपर्यंत जांभूळ फळे लगडतात.

बाजारपेठ: 

कमी खर्चात जांभळाचे पीक घेतले जाते. सध्या जांभळाची हार्वेस्टिंग सुरु आहे. ज्याची मार्केटला किंमत 400 रुपये प्रतिकिलो इतकी आहे. यामुळे त्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे. पांढऱ्या रंगाच्या जांभळात विविध औषधी गुण आहेत. यामुळे याची मागणी देखील जास्त आहे.या फळाची मागणी दिल्ली बेंगलोर मुंबई पुणे यांसारख्या मेट्रो शहरात मोठ्या प्रमाणात असते. या फळाला इतर जांभळापेक्षा अधिक बाजार भाव प्राप्त होत असतो, या पांढऱ्या जांभळाला सुमारे चारशे रुपये प्रति किलोपर्यंत असा दर मिळत असल्याचे सांगितले जाते.



फळ उपलब्ध

पांढरे जांभूळ हे बाहेरून तसेच आतून देखील पांढऱ्या रंगाचे असून यास बाजारामध्ये आता बऱ्याच प्रमाणात मागणी होत आहे. पारंपरिक जांभळय़ा रंगाचे जांभूळ पावसाळय़ात सुरुवातीला खाण्यासाठी उपलब्ध होतात. परंतु पांढऱ्या रंगाचे जांभूळ त्या अगोदरच म्हणजे उन्हाळय़ात शरीर थंड ठेवण्यासाठी एप्रिलमध्येच चाखायला मिळते.

 झाडांचे महत्त्व: 

जगात मधुमेही रुग्ण वरचेवर वाढत आहेत. त्यामुळे जांभळाचे महत्त्वही अबाधित राहणार आहे. शेतीकारणाचा विचार करताना शेतात काय पिकते, यापेक्षा बाजारात काय विकते, हे ज्या शेतकऱ्याला कळते, तोच शेतकरी खऱ्या अर्थाने प्रगतशील म्हणून ओळखला जातो, पांढरे जांभूळ शेती शेतकऱ्यांना प्रगतशील म्हणून ओळख निर्माण करून देताना त्यांची आर्थिक पत वाढविण्यासाठी निश्चितच हातभार उचलण्यास नवा आदर्श ठरण्याची अपेक्षा आहे. विशेषत: नैराश्येतील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा विचार महत्त्वाचा वाटतो.



Monday, 10 April 2023

काळा ऊस' हा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास खूप फायदेशीर आहे




काळा ऊस' हा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास खूप फायदेशीर आहे

भारतात काळ्या ऊसाची लागवड प्रामुख्याने मध्यप्रदेश, गुजरात आणि दक्षिण भारतातील काही भागात केली जाते. त्याचा फायदा बद्दल बोललो तर ते असंख्य आहेत.त्यामुळे त्याची मागणी अचानक वाढू लागली असून शेतकरी हे त्याच्या लागवडीत अधिक भर घालताना दिसत आहेत. या काळ्या ऊसाच्या अनेक औषधी गुणधर्मामुळे या ऊसाची मागणी आता वाढू लागली आहे. त्यामुळे शेतकरीही त्याच्या लागवडीवर अधिक भर देताना दिसत आहेत.


काळा ऊस. Sugarcane variety that is a little black to purple in colour is commonly referred to as Black sugarcane.

 काळा ऊस हा नेहमीच्या उसापेक्षा वेगळा असतो; ते नेहमीच्या तुलनेत मऊ आणि गोड असते, जे बहुतेक रस आणि साखर किंवा गूळ तयार करण्यासाठी वापरले जाते.


वाशीम शहरापासुन ५ कि.मी अंतरावर काटेपुर्णा आणि पुस नदीच्या पात्रात वसलेले काटा हे गाव महाराष्ट्रात काळ्या ऊसाच्या लागवडीसाठी प्रसिध्द आहे.या गावात उत्पादन घेत असलेल्या काळ्या ऊसाची सर्वत्र चर्चा आहे.१८ व्या शतकात मुंबईचे शिल्पकार म्हणून ख्याती असलेले जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांनी खास मॉरिशस या देशातुन काळ्या ऊसाचे वाण आणले होते. कालंतराने तेच वाण काटा या गावातील तत्कालिन शेतकऱ्यांनी मिळवुन ऊस शेती करायला सुरूवात केली. म्हणुनच या ऊसाला मॉरीशियस ऊस असे देखील म्हटले जाते.आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असलेल्या काट्याच्या या काळया ऊसाला महाराष्ट्र राज्यासह शेजारील मध्यप्रदेश, तेलंगणा व गुजरात या राज्यातही मागणी आहे.



    काळ्या  उसाचे फायदे :

1) काळ्या उसामुळे पुरळ बरा होतो :-

 अनेकदा आपल्या चेहऱ्यावर आणि शरीरावर काळे पुरळ येतात.यातून सुटका करण्यासाठी लोक कोणते उपाय करतात, किती पैसे खर्च करतात हे अनेकांना माहीत नसते,पण त्याचा फारसा परिणाम होत नाही तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला हा त्रास होत असेल तर तुम्ही त्यांना काळ्या उसाचे सेवन करण्याचा सल्ला देऊ शकता. हे मुरुमे दूर करतो आणि वाढण्यास प्रतिबंध करतो.

2) काळा ऊस सुरकुत्या दूर करतो :-


 वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या येणं सामान्य गोष्ट आहे, पण महिलांना ही गोष्ट अनेकदा आढळते. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर रोज उसाचा रस प्या.त्यामुळे तुमची त्वचा ताणली जाईल आणि सुरकुत्या पडणार नाहीत. चेहऱ्यावर महागडी क्रीम आणि औषधे वापरण्यापेक्षा रोज 1 ग्लास काळ्या उसाचा रस पिणे चांगले.

3) झटपट ऊर्जेसाठी काळा ऊस उत्तम आहे :-


 उन्हाळ्यात लोक लगेच थकतात. कारण उच्च तापमानामुळे अस्वस्थता वाढते. जे तुमच्या शरीरातून जास्त उर्जा घेते आणि तुम्हाला लवकरच थकवा जाणवू लागतो.अशा स्थितीत तुम्ही बाजारात उपलब्ध अनेक एनर्जी ड्रिंकचे सेवन करता, ज्यामुळे तुम्हाला लगेच एनर्जी मिळते. हे तुम्हाला झटपट ऊर्जा देते, परंतु ते तुमच्या शरीराला खूप नुकसान करत. त्यामुळे अचानक साखरेची पातळी वाढते. म्हणूनच झटपट उर्जेसाठी तुम्हीकाळ्या उसाचा रस पिऊ शकता. तुम्हाला ते कोणत्याही रस्त्याच्या चौकात सहज मिळेल आणि ते प्यायलाही खूप चवदार आहे. त्याचाही कोणताही दुष्परिणाम होत नाही.

4) श्‍वासाची दुर्गंधी आणि दातांच्या आजारावर गुणकारी :- 

खाण्याच्या चुकीच्या सवयी मुळे अनेकदा तुमच्या पोटात समस्या निर्माण होतात.त्यामुळे श्वासात दुर्गंधी येण्याची समस्या निर्माण होते. ही समस्या तुम्हाला इतरांसमोर वेगळे पाडू शकते. त्याच वेळी यामुळे वेदना किंवा पायोरियासारखे रोग अनेकदा आपल्या दातांमध्ये आढळतात.ज्या पासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काय करता हे माहीत नाही, पण आता तुम्ही या सर्व गोष्टींपासून सहज सुटका मिळवू शकता. काळ्या उसाचे सेवन केल्याने तुम्ही यापासून सहज सुटका करू शकता.

5) काळा ऊस वजन कमी करण्यास उपयुक्त आहे :-


 अनेकदा लोकांचा असा समज असतो की मिठाई खाल्ल्याने तुमचे वजन वाढते, पण तसे नेहमीच नसते. काळ्या उसाचे सेवन केल्याने तुम्ही तुमचे वजन सहज वाढण्यापासून रोखू शकता. दररोज मर्यादित प्रमाणात याचे सेवन केल्याने तुमचे वाढते वजन रोखण्यास मदत होते.      








Ten Important Farm Machinery with Uses

  Ten Important Farm Machinery in India with Uses Plough : Tractor Ploughing is the most common and efficient farming practice. Plough is th...