राजमा : महाराष्ट्रातील रब्बीच्या हंगामात अधिकचे उत्पन्न देणारे शेंगावर्गीय पिक
राजमा हे उष्ण कटिबंध प्रदेशात मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. आफ्रिका, युरोप आणि अमेरिका येथे याला खूप मोठया प्रमाणात डाळ म्हणून खाल्या जाते. भारतात राजमा हा उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आणि आंध्र प्रदेश मध्ये पिकवला जातो.
राजमा हे थंड हवामानात येणारे पीक आहे.हे पिक साधारण 75 ते 85 दिवसात तयार होते. त्यामुळे पाण्याची मुबलक प्रमाणात व्यवस्था असल्यास हिवाळ्यामध्ये राजमा आणि उन्हाळ्यामध्ये भुईमुग या पिकास अवलंब करता येतो.राजमा हे पिकाचा वेल मुगासारखे आहे. त्याची उंची गुडघ्या इतकी असते. याचे दाणे घेवडा व काही प्रमाणात येरंड्यासारखी दिसतात. या पिकापासून मिळणाऱ्या दाण्यांचा हॉटेलात भाजीसाठी वापर केला जातो. त्यातून प्रोटीन मोठ्या प्रमाणात मिळतात, त्यामुळे आरोग्यासाठी ते चांगले आहे. याच्या कोवळ्या शेंगाचीही भाजी तयार होते. त्यामुळे बाजारात याला चांगली मागणी आहे.
लाल रंगाची थोडी गुलाबी असलेली ही किडनी बीन्स (kidney beans) आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यवर्धक आहे. या बियांची भाजी मोठया आवडीने आपल्याकडे खाल्ली जाते व तितकेच red kidney beans चे आरोग्यासाठी फायदे सुद्धा आहेत. राजमा लाच आपल्या मराठी भाषेत घेवडा असे म्हणतात. याला किडनी बीन्स असे म्हणतात. कारण याचा आकार हा किडनी सारखा आहे.
राजमा चे प्रकार :
1) हलका लाल राजमा
हा राजमा बाकी राजमा पेक्षा आकारात थोडा मोठा असतो याला शिजायला 90 ते 120 मिनिट लागतात.
2) काळा राजमा
हा मिडीयम आकार असलेला काळा रंगाचा चा राजमा आहे. हा राजमा खायला गोड असतो
3) गर्ध लाल राजमा
हा राजमा आकारामध्ये थोडा मोठा असतो. याचा वापर जास्त सूप तयार करण्यासाठी केला जातो.
4) नेवी बीन्स
हा राजमा छोटा असतो. याला शिजायला 90 ते 120 मिनिटं लागतात. हा राजमा पण आकाराने छोटा असतो. याला शिजायला फक्त 60 मिनिटे लागतात. लवकर राजमा तयार करायचा असेल तर हा राजमा जास्त वापरला जातो.
5) पिटो राजमा
हा राजमा जास्त प्रमाणात रशिया मध्ये खाल्ला जातो. याचा आकार हा मिडीयम असतो.
जमिनीची निवड व मशागत :
राजमा या पिकास मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिनी सर्वोत्तम ठरते. चोपण अथवा पाणी साचणारी जमीन या पिकाकरीत निवडू नये. खरीप हंगामातील पिकांची कापणी झाल्याबरोबर राजमा या पिकाचे जास्त उत्पादन मिळण्याकरिता जमीन लोखंडी नागराने किंवा ट्रॅक्टरद्वारे नांगरून नंतर वखराच्या दोन- तीन पाळ्या देवून जमीन भुसभुशीत करावी.
योग्य जातीची निवड :
वेळेवर म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी करिता व्हीएल 63, एचयुआर 15, पीडिआर 14, एचयुआर 137 या जातीची निवड करावी. उशीरा पेरणी करिता एचयुआर 87 व एचयुआर 137 ह्या जातीची लागवड करावी.
पेरणी :
या पिकाची पेरणी वाणानुसार करावी एचयुआर 15 आणि पीडीआर 14 हे वाण असल्यास दोन ओळीतील अंतर 30 से.मी. त्याचप्रमाणे दोन रोपातील अंतर 10 से.मी. ठेवावे. आणि व्हीएल 63 आणि एचयुआर 137 या वाणाकरीता दोन ओळीतील अंतर 45 से.मी. तर दोन झाडामधील अंतर 10 सेमी. ठेवावे लागणार आहे.
खताच्या मात्रा आणि पाण्याचे नियोजन :
राजमा या पिकाचे भरपूर उत्पादन करिता पेरणीच्या वेळेस 90 किलो नत्र आणि 60 किलो स्फुरद या प्रमाणात रासायनिक खताच्या मात्रा दयाव्यात . पिक फुलोऱ्यात असताना 2 टक्के युरीयाची फवारणी केल्यास उत्पन्नात वाढ होते. राजमा या पिकाला साधारण 7 ते 9 पाळ्या द्यावा लागतात. पेरणी आगोदर पाणी देवून वाफसा आल्यानंतर पेरणी करावी. पेरणीनंतर पून्हा पाणी द्यावे. बियाण्यावर मातीचा कडक थर जमा झाल्यास 3 ते 4 दिवसांन पाणी द्यावे यामुळे बियाणे उगवण्यास मदत होते. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 10 ते 15 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या घालाव्या लागणार आहे.
राजमा हे एकूण ८० दिवसांचे पीक असून ६५ दिवसात शेंगा (legumes) लागतात. हिरव्या शेंगांनाही स्थानिक बाजारात उचल मिळते.
बियाण्याचे प्रमाण :
प्रति हेक्टरी 40 किलो बियाणे लागते. टोकन पध्दतीने लागवड केल्यास हेक्टरी 25 ते 30 किलो बी लागते.
उत्पादन :
श्रावण घेवडयाचे हेक्टरी उत्पादन 27 क्विंटलपर्यंत घेता येते.
No comments:
Post a Comment