Tuesday, 4 April 2023

लाल बटाट्याची शेती:

 

लाल बटाट्याची शेती:

लाल बटाट्याची लागवड: शेतकरी गहू, भात, मका, बाजरी आणि मोहरीची लागवड करून चांगला नफा कमावतात, परंतु शेतकरी बांधवांना जर काही चांगले करायचे असेल तर ते लाल बटाट्याची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात. राजस्थानमधील शेतकऱ्यांनी या जातीच्या बटाट्याची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. बटाट्याच्या खपासाठी इतर राज्यांतील कंपन्यांशीही वाटाघाटी केल्या असून तो बाजारात विकून मोठा नफा कमावत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.











नापीक जमिनीला खत दिले


राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील भूतगाव येथे दिनेश माळी लाल बटाट्याची लागवड करतात. दिनेशने सांगितले की, त्यांच्याकडे जवळपास 80 बिघे जमीन असून त्यातील निम्मी जमीन नापीक पडून होती, पण खूप मेहनत आणि संशोधन करून त्यांनी जमीन सुपीक केली आणि त्यात लाल बटाट्याची लागवड सुरू केली.

संत्रा जातीचा बटाटा गुजरातमधून आणला
बटाट्याची पेरणी करण्यापूर्वी दिनेशला कोणते पीक पेरायचे असा प्रश्न पडला होता, जेणेकरून त्याचे उत्पादन चांगले मिळू शकेल. याबाबत त्यांनी ऑनलाइन जाऊन कृषी विभागाकडे माहिती गोळा केली. त्यानंतर त्याला लाल बटाट्याची माहिती मिळाली आणि गुजरातमधून त्याचे बियाणे आणल्यानंतर त्यांनी पेरणी केली.

बटाट्याचे काप:

गुजरातमधून बटाट्याची कलमे आणली आहेत. त्याचबरोबर गुजरातमध्येही त्याच्या वापराची योजना तयार करण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये पेरणी केल्यानंतर हे पीक सुमारे 120 दिवसात पिकल्यानंतर तयार होते. यापासून बनवलेल्या बटाट्याच्या चिप्सना बाजारात चांगली मागणी आहे.

हृदयरोग, कर्करोग प्रतिबंध:


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की लाल बटाटा आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हृदयविकार कमी करण्यासोबतच कर्करोगासारख्या घातक आजारापासूनही आपले संरक्षण करते. त्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात आणि फायबर्स खूप चांगल्या प्रमाणात आढळतात.:



Monday, 3 April 2023

दूधानंतर आता शेणालाही चांगले दिवस येणार! आता पेट्रोल-सीएनजीवर नाहीतर थेट शेणावर चालणार कार:

 

दूधानंतर आता शेणालाही चांगले दिवस येणार! आता पेट्रोल-सीएनजीवर नाहीतर थेट शेणावर चालणार कार:


सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. याचे कारण म्हणजे सध्या दुधाला चांगले दर आहेत. आता शेणाला देखील मागणी येणार आहे. आता प्रदूषण कमी करणारे इंधन शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत जपानी कंपनी सुझुकीची (Maruti Suzuki) भारतीय उपकंपनी मारुतीने शेणावर चालणारी कार लॉन्च (Financial) करण्याबाबत चर्चा केली आहे.


यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. शेतकऱ्यांसाठी (Department of Agriculture) ही कार प्रचंड फायदेशीर ठरणार आहे. मारुती सुझुकीचे सीएनजी मॉडेल बायोगॅसने चालवता आले, तर ती क्रांतीच ठरेल. भारतात गायीला (Cow Dung) नेहमीच उच्च दर्जा दिला गेला आहे. गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट उपयुक्त असते.


दूध, शेण आणि मूत्र यानंतर आता ते तांत्रिक पातळीवरही सिद्ध होताना दिसत आहे. सुझुकी आता अशाच एका तंत्रज्ञानावर काम करत आहे. वाढते प्रदूषण आणि महागडे तंत्रज्ञान हाताळण्यासाठी कंपनीने बायोगॅस प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. शेणापासून बायोगॅस (Biogas) तयार केला जातो, त्यामुळे आपल्या देशात त्याची निर्मिती करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील.

आता सुझुकी आगामी काळात आफ्रिका, आसियान आणि जपानसह अनेक देशांमध्ये बायोगॅस सुरू करून निर्यात करण्याचा विचार करत आहे. सुझुकीने भारत सरकारच्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि बनास डेअरीसोबत सामंजस्य करारही केला आहे.

कृषी विज्ञान केंद्र / Krishi Vigyan Kendra (KVK) :

 

कृषी विज्ञान केंद्र / Krishi Vigyan Kendra (KVK) :

राज्यातील कृषि व संबंधित विभागातील अधिकार्यांना व कर्मच्यार्यांना नवनवीन कृषि उच्च तत्राज्ञानाबाबत चारही कृषि विध्यापिठामार्फत प्रशिक्षण दिले जाते. विध्यापिठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान प्रदर्शने, प्रात्याक्षिके , मेळावे, प्रकाशाने, शिवार फेरी व प्रशिक्षणाद्वारे राज्याच्या विस्तार यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जाते. कृषि विद्यापीठांतर्गत केंद्रांमार्फत व खाजगी व्यवस्थापनाखाली प्रत्येक जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या केंद्रामार्फत हे कार्य केले जाते. तसेच कृषि प्रशिक्षणाचे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. राज्यातील कृषि विस्तार यंत्रणेला नवीन विकसित झालेल्या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षित करणे आणि यांच्यामार्फत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी विध्यापिठातील संशोधकांपर्यंत पोहोचवून शेतकर्यांना आवश्यक असणारे संशोधन विद्यापीठात करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.


 कृषि विज्ञान केंद्रे
Sr.NoName of KVK ProgrammeCo-ordinatorContactE-mail
1Krishi Vigyan Kendra, DhuleDr. Dinesh Nandre, Programme Co-ordinator02562-230362pckvkdhule@rediffmail.com
2Krishi Vigyan Kendra, Mohol Dist. Solapur ( Solapur- II )Dr. Tanaji Walkunde, Programme Co-ordinator02189-233001kvkmohol@yahoo.com,kvkmohol@rediffmail.com
3Krishi Vigyan Kendra, Mamurabad Farm, Jalgaon ( Jalgaon - II )Dr. Hemant Baheti, Programme Co-ordinator0257-2020510kvkjalgaon@rediffmail.com,pckvkjalgaon@gmail.com
4Krishi Vigyan Kendra, Borgaon, Dist. Satara ( Satara - II )Prof. Mohan Shirke, Programme Co-ordinator02162-295625kvkborgaon_satara@yahoo.com




B. NGO & Other Institute KVKs

Sr.NoName of KVK ProgrammeCo-ordinatorContactE-mail
1Krishi Vigyan Kendra, Babhaleshwar Dist. Ahmednagar ( Ahmednagar - I )Dr. Sambhaji Nalkar, Programme Co-ordinator02422-252414kvkahmednagar@yahoo.com
2Krishi Vigyan Kendra, Nashik (YCMOU) ( Nashik - I )Shri.Raosaheb Patil, Programme Co-ordinator0253-2231715kvknashik@rediffmail.com
3Krishi Vigyan Kendra, Baramati, Dist. Pune ( Pune - I )Dr. R. S. Jadhav, Programme Co-ordinator0211-2255207kvkbmt@yahoo.com
4Krishi Vigyan Kendra, Kolde Dist. NandurbarShri. Rajendra Dahatonde, Programme Co-ordinator02564-240544kvk_ndb@yahoo.com
5Krishi Vigyan Kendra, Pal Dist. Jalgaon ( Jalgaon - I )Mr. S. J. Mahajan, Programme Co-ordinator02584-288439kvk_pal@yahoo.co.in
6Krishi Vigyan Kendra, Kegaon , Dist. Solapur ( Solapur -I )Dr. Lalasaheb Tambade, Programme Co-ordinator02172-350359kvksolapur@yahoo.co.in
7Krishi Vigyan Kendra, Kalwade Dist. Satara ( Satara -I )Dr. B. S. Khandekar, Programme Co-ordinator02164-288070pckvkkarad@rediffmail.com
8Krishi Vigyan Kendra, Prakash Nagar Dist. SangliShri. Aslam Shaikh, Programme Co-ordinator0233-2311024kvksangli@rediffmail.com
9Krishi Vigyan Kendra, Talsande, Dist. Kolhapur ( Kolhapur - I)Dr. Jaywant Jagtap, Programme Co-ordinator0231-2653426kvkkolhapur@gmail.com
10Krishi Vigyan Kendra, Narayangaon Dist. Pune ( Pune -II )Shri. Prashant Shete, Programme Co-ordinator02132-242080gmnkvk@gmail.com
11Krishi Vigyan Kendra, Malegaon Dist. Nashik ( Nashik - II )Shri. Amit Patil, Programme Co-ordinator0253-2577666rardc.kvknsk@gmail.com
12Krishi Vigyan Kendra, Kanerimath, Dist. Kolhapur ( Kolhapur -II)Dr. Ravindra Singh, Programme Co-ordinator0231-2980001kvkkolhapur2@gmail.com
13Krishi Vigyan Kendra, Dahigaon ne Dist. Ahmednagar ( Ahmednagar -II )Dr. Shamsundar Kaushik, Programme Co-ordinator02429-272030kvkdahigaon@gmail.com



3

शेवगा पावडर : बचतगटातील / महिलांसाठी उद्योग

 बचतगटातील (SHG) महिलांना, शेवगा पावडरचा चांगला उद्योग रता येईल. शेवगा लागवडीसोबत पानांची देखील विक्री करता येते किंवा शेतातच एक प्रक्रिया युनिट सुरू करता येते.

शेवगा पानांच्या पावडरचे (मोरिंगा पावडर) फायदे :

शेवग्याच्या शेंगांना इंग्लिश मध्ये ‘Drumstick tree’ असे म्हणतात. या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव ‘मोरिंगा ओलिफेरा’ (Moringa oleifera) असे आहे. शेवग्याच्या पानांची पावडर केली जाते आणि या पावडरला Moringa powder किंवा Drumstick leaves powder असेही म्हणतात. Horseradish tree, ben oil tree अशीही काही नावे आहेत. शेवग्याला हिंदी मध्ये ‘सहजन’ असे नाव आहे.

आपण महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा भारतातील लोक अगदी चवीने आणि वेगवेगळ्या पद्धतीने शेवग्याची भाजी किंवा शेवग्याची आमटी करून खातात. साऊथ इंडियन पदार्थातीळ सांबर मध्ये तर शेवग्याच्या शेंगा असतातच. आपल्याकडे ही वनस्पती अगदी सहज उपलब्ध होते. म्हणूनच आपण एक भाजी म्हणून शेवग्याचा वापर करतो. पण प्राचीन काळापासून माणूस या वनस्पतीचा औषधी उपयोग करत आला आहे. आधुनिक काळात अमेरिकेसारख्या देशात मोरिंगा पावडर भारतातून आयात केली जाते. तिकडे किंवा आपल्याकडेही शेवग्याला मोरिंगा सुपरफूड (Moringa superfood) असेही ओळखले जाते.

शेवगा किंवा मोरिंगा पावडर व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अमिनो असिड्स ने समृद्ध असते.
जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध (Moringa powder is Vitamins and Minerals rich)

हे संशोधनातून सिद्ध झाले आहे की मोरिंगा पावडरमध्ये संत्र्याच्या सात पट व्हिटॅमिन सी असते. गाजराच्या चार पट व्हिटॅमिन अ (vitamin A) असते. दुधाच्या चार पट कॅल्शिअम (calcium) असते. केळीच्या तीनपट पोटॅशियम असते. पालकाच्या पाऊण पट लोह (iron) असते. आणि दह्याच्या दुप्पट प्रथिने किंवा Proteins असतात. हे वाचल्यानंतर कुणीही समोर आलेली शेवग्याची भाजी, वरण, सांबर किंवा आमटी नाकारणार नाही. कारण इतकं पोषणतत्वे खचून भरलेली भाजी आपल्याकडे सहज मिळते. चला तर पाहूया या वनस्पतीचे आरोग्यासाठी होणारे फायदे.

नैसर्गिकरित्या वजन कमी करणारा पदार्थ – Moringa powder Best food for weight loss for male and female

शेवग्याच्या पानांमध्ये क्लोरोजनिक ऍसिड (Chlorogenic acid) हे antioxidents असते जे नैसर्गिकरित्या चरबी घटवण्याचे काम करते म्हणजेच Natural Fat Burner असते. हे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्याचे काम करते. शेवग्याचे नियमित सेवन वजन कमी करण्यात मदत करते.

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मोरिंगा पावडर Moringa powder benefits for male and female haircare

मोरिंगा पानांची पावडर मध्ये रक्त शुध्द करणारे घटक असतात. केस आणि अमिनो असिड्स (amino acids) आणि केरॅटीन प्रोटीन (Keratine proteine) असतात. या घटकांमुळे केस लांब आणि दाट होतात.

मोरिंगा पावडर पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते Moringa powder helps is Metabolism


मोरिंगा पावडर हे चयापचय क्रिया सुधारणारा आहार (Metabolism boosting diet) म्हणून ओळखले जाते. यामध्ये जे तंतुमय पदार्थ असतात ते पचन कार्याची गती वाढवतात. बद्धकोष्ठता कमी होते. पोटातील इन्फेक्शन पण या वनस्पतीचे सेवन केल्याने कमी होते.

मोरिंगा पावडर त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते Moringa powder keeps skin young and healthy

प्रदूषण, घाम, उष्णता यामुळे आपल्या त्वचेवर विविध जिवाणू विषाणू याची वाढ होते. त्यामुळे त्वचेचे सौंदर्य कमी होते. यात अँटीफंगल, अँटीबॅक्टरीअल अनो अँटिटॉक्सिक घटक असतात ते या जिवाणूंची वाढ प्रतिबंधित करतात. यामध्ये व्हिटॅमिन अ जाइत प्रमाणात असते. व्हिटॅमिन अ हा त्वचेला सुंदर ठेवणारा घटक आहे.

म्हणून भरपूर सौंदर्य प्रसाधनांमध्ये मोरिंगा पावडरचा उपयोग केला जातो. यामध्ये लोह असते जे रक्त शुद्ध करण्यास मदत करते. त्यामुळे पिंपल्स चा नाश होतो.

मोरिंगा पावडर लहान मुलांसाठी टॉनिक

शेवगा पावडर मध्ये भरपुर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असते. कॅल्शियम हे हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी आवश्यक असते. यामध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस पण असते जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. म्हणुन मोरिंगा पावडर लहान मुलांसाठी टॉनिक सारखे काम करते

रक्तातील साखर नियंत्रक मोरिंगा पावडर (Moringa powder controls Blood Sugar level )

मोरिंगा पावडरचे नियमित सेवन केल्याने शरीराला खूप फायदे होतात. आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत राहिल्याने एक दिवस त्याची परिणती मधुमेह होण्यात होते. मोरिंगा पावडर रेग्युलर सेवन केल्याने किंवा शेवग्याची भाजी आहारात ठेवल्याने रक्तातील साखर कमी होते. म्हणून मोरिंगा पावडर डायबेटीस नियंत्रक (Moringa powder diabetes controller) म्हणून वापरली जाते.गर्भवती महिलांसाठी फायदेशीर
हे पावडर गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन, मिनरल्स असतात ज्यामुळे गर्भाची हाडे निरोगी तयार होतात. महिलेलाही यातील कॅल्शियम, पोटॅशियम, लोह यांचा फायदा होतो. हे घटक आई आणि बाळ याना निरोगी ठेवण्यात सहकार्य करते.

प्रसुतीनंतर महिलांसाठी फायदेशीर Moringa powder benefits for female in pregnancy

प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर गर्भाशयाचे आरोग्य राखण्यात शेवगा किंवा मोरिंगा पावडर किंवा शेवग्याची भाजी खूप उपयोगी आहे. आणि हे दुभत्या मातांसाठी दूध वाढवण्यात मदत करते. प्रसुतीनंतर होणार त्रास कमी करण्यातही सहाय्य करते.

उच्च रक्तदाब कमी करते Moringa powder lowers blood pressure

मोरिंगा पावडर किंवा शेवग्याच्या शेंगांमध्ये पोटॅशियम खुप प्रमाणात असते. पोटॅशिअम हे उच्च रक्तदाब कमी करण्यात मदत करते. BP कमी करण्यासाठी हा एक चांगला, स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहे.









आशा प्रकारे आहारात समावेश करा

आपण शेवग्याचे आश्चर्यचकित करणारे गुणधर्म पाहिले आहेत. तुम्ही शेवग्याचे सेवन पुढीलप्रमाणे आपल्या आहारात करू शकता

महाराष्ट्रात शेवग्याच्या शेंगा भाजी मंडईत सर्रास उपलब्ध असतात. त्या विकत घेऊन तुम्ही शिजवलेली भाजी करू शकता. आमटी किंवा रस्सा भाजीही करता येईल. या शिजवलेल्या शेंगांच्या आतील भाग तुम्ही दातांनी खरडून खाल्ले तर तुम्हाला यातील सगळी पोषणतत्वे मिळतील.

शेवग्याचे सांबर किंवा आपल्या भाषेत वरण करून खावे. खूप स्वादिष्ट लागते.

शेवग्याच्या झाडाची ताजी पाने आणून त्यांचा ज्यूस करून पिता येईल.

ही पाने कोशिंबीर किंवा सलाडमध्ये सुद्धा टाकुन खाता येतील.

हे पावडर बनवून घरात ठेवून रोज सेवन करावे. ही पाने स्वच्छ कपड्यावर हवेशीर खोलीत किंवा सावलीत काहीतरी जाळीदार झाकून वाळवावे लागतील. थेट सूर्यप्रकाशात वाळवू नये. ही पाने वाळायला तीन ते चार दिवस लागतात. वाळल्यानंतर ती मिक्सरमध्ये भुकटी करून हवाबंद डब्यात भरून ठेवावे.

हे मोरिंगा पावडर तुम्ही सलाडमध्ये, भाजीमध्ये किंवा कोमट पाण्यात सेवन करू शकता. 

.शेवग्याच्या वाळलेल्या पानामध्ये ताज्या पानांपेक्षा अधिक पोषकतत्वे असतात आणि वापरण्यास अगदी सहज व सोपे जाते. शेवगा पानांच्या (Moringa Leaves) पावडरची कॅप्सुलदेखील (Moringa Powder Capsule) बाजारात उपलब्ध आहे. बचतगटातील (SHG) महिलांना, शेवगा पावडरचा चांगला उद्योग रता येईल. शेवगा लागवडीसोबत पानांची देखील विक्री करता येते किंवा शेतातच एक प्रक्रिया युनिट सुरू करता येते.  शेवगा वनस्पतीचा प्रत्येक भाग हा शरीरासाठी खूप गुणकारी आहे. आहाराबरोबरच शेवग्याचा वापर पाणी शुद्धीकरणासाठी केला जातो. विदेशात शेवग्याच्या पानांपासून तयार केलेल्या भुकटीचा विविध प्रकारे वापर केला जातो. अशी भुकटीला भावही चांगला मिळतो. शेवग्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, मॅग्नेशिअम, जीवनसत्त्व अ, सी व बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात आढळतात. 

शेवग्याच्या पानाची पावडर तयार करण्याची घरगुती पद्धत 

- शेवग्याची ताजी पाने घेऊन चांगल्या प्रकारे धुवून सावलीत वाळवावीत. पाने सूर्यप्रकाशात वाळवल्यास त्यातील काही प्रमाणात पोषक तत्त्वांचा ऱ्हास होतो.  

- शेवग्याची पाने वाळवताना जाळीदार कापडाने झाकावीत. पाने पूर्णतः वाळण्यासाठी किमान तीन दिवस लागतात.   

- पाने पूर्णतः वाळल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर करावी. तयार पावडर  हवाबंद डब्यात साठवावी, 

फायदे काय आहेत?

शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम व ॲंटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळतात.   

१०० ग्रॅम भुकटीत दुधापेक्षा १७ पट अधिक कॅल्शियम व पालकापेक्षा २५ पट अधिक लोह असते. 

गाजरापेक्षा १० पट अधिक बीटा-कॅरोटीन असते. हे बीटा कॅरोटिन डोळे, त्वचा व रोगप्रतिकारतेसाठी फायद्याचे असते.   

शेवग्याच्या पानांमध्ये क्लोरजेनिक ॲसिड असून, ते नैसर्गिकरीत्या चरबी कमी करण्याचे काम करते. 

शरीरातील जमा होत राहणाऱ्या विषारी घटकाचे विरेचन करण्याचे काम शेवग्याच्या पानांची भुकटी करते. 

शेवगा हा ॲमिनो ॲसिडचा उत्तम स्रोत असून, त्यामुळे केरेटीन नावाचे प्रोटीन तयार होण्यास मदत होते. या प्रोटीनमुळे केस लांब व दाट होतात.   

या भुकटीत असलेल्या तंतूमय पदार्थांमुळे पचनक्षमता सुधारते, तसेच बद्धकोष्टता कमी होते. 

शेवग्यात ॲमिनो ॲसिड ट्रिप्तोफन असून, त्यामुळे मेलाटोनीन हे संप्रेरक तयार होण्यास मदत होते. या सर्व औषधी गुणांमुळे शेवगा ही आरोग्यदायी वनस्पती म्हणून ओळखली जाते.      


Sunday, 2 April 2023

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची रु. १ लाख कोटीची योजना २०२०-२१ ते २०२९-३०

 

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची रु. १ लाख कोटीची योजना २०२०-२१ ते २०२९-३०

केंद्र शासनाच्या अंतर्गत राबवली जाणारी ‘ कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत- वित्त पुरवठा सुविधा ‘ (‘Agriculture Infrastructure Fund’) तसेच कर्जावरील व्याजात ३% सवलत योजेनेची माहिती पाहणार आहोत. या योजने अंतर्गत कोणत्या कोणत्या प्रकल्पासाठी कर्ज मिळू शकते, त्याचा व्याज दर किती असेल, योजनेचा कालावधी किती वर्षाचा असणार आहे, आवश्यक कागदपत्रेअर्ज कुठे करावा या सर्वांची सखोल माहिती पाहणार आहोत.

केंद्र सरकारने या योजने अंतर्गत सुमारे रु. १ लाख कोटी नियतव्यय प्रास्ताविक केला असून ही योजना सन २०२०-२१ ते २०२९-३० या दहा वर्ष कालावधीत राबवणार येणार आहे. या योजने अंतर्गत राज्य शासन पहिल्या वर्षी रु.१० हजार कोटी व त्यानंतर पुढील ३ वर्षांमध्ये  प्रतीवर्ष रु. ३०  हजार कोटी निधी उपलब्ध करणार आहे. या योजनेच्या रु. १ लाख कोटी निधीतून महाराष्ट्रास ४ वर्षांच्या  कालावधीत रु.८,४६० कोटी निधी उपलब्ध होणार आहे. असे या योजनेच्या GR मधे नमूद केले आहे.

या योजनेचा लाभ काय आहे:
  •  काढणी पश्चात पायाभूत सुविधा उदा. गोदाम,पैक हाऊस,कोल्ड स्टोरेज,  प्रक्रिया केंद्र, वाहतुक सुविधा इ .साठी बँके कडून कर्ज मिळेल.
  •  रु. २ कोटी पर्यंतच्या कर्जावर पत हमी.
  • ज्यांना प्रथम कर्ज वितरण ८ जुलै २०२० ला नाहीतर त्या नंतर झाले असेल     असे प्रकल्प व्याजदर सवलतीस पात्र असणार आहेत.
  •  या प्रकल्पांना इतर योजनेतून ही अनुदान मिळू शकेल. हे अनुदान प्रवर्तकाचा प्रकल्पातील आर्थिक हिस्सा म्हणून गणला जाइल. 
  • मात्र, प्रवर्तकाला प्रकल्प किमतीच्या किमान १० टक्के हिस्सा तरी स्वतः घालणे अनिवार्य आहे. 

नोट: 

या योजने अंतर्गत रु. २ कोटी च्या कर्जावर ७ वर्ष कालावधीसाठी ३ टक्के प्रमाणे व्याज सवलत मिळेल.

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात:

१.राज्य यंत्रणा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रस्तावित केलेले सार्वजनिक-खाजगी भागिदारी प्रकल्प.
२. शेतकरी, कृषी उद्योजक, स्टार्ट-अप्स
३. गट- स्वयंसहायता गट, संयुक्त दायीत्व गट
४. बहूउद्देशीय सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था ,संस्था- विविध कार्यकारी सहकारी संस्था (प्राथमिक कृषी पत     संस्था ), सहकारी पणन संस्था,

खालील प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज मिळेल:
  १. काढणी पश्चात व्यवस्थापनाचे प्रकल्प-
  • गोदाम
  • लॉजिस्टीक सुविधा
  • पैक हाऊस
  • प्राथमिक प्रक्रिया केंद्र
  • संकलन व प्रतवारी केंद्र
  • इ-मार्केटिंग प्लेटफॉर्म सह पुरवठा साखळी सेवा
  • शीत साखळी
  • असेयींग यूनिटस
  • रायपनिंग चेंबर्स
  • मूरघास



२. सामुदायिक शेती साठीचे प्रकल्प:
  • केंद्र/राज्य/स्थानिक स्वराज्य संस्था अथवा त्यांच्या अधिनस्त यंत्रणांनी सार्वजनिक-खाजगी भागिदारीतून प्रस्तावित केलेले सामुदायिक
  • शेतीसाठी मालमत्ता निर्मिती प्रकल्प किंवा काढणीपश्चात व्यवस्थापनाचे प्रकल्प.
  • स्मार्ट व काटेकोर शेती करिता पायाभूत सुविधा
  • सेंद्रीय निविष्ठा उत्पादन
  • पिकांचे समूह क्षेत्र तसेच निर्यात क्षेत्रामध्ये पुरवठा साखळी करिता पायाभुत सुविधा विकासाचे निश्चीत केलेले प्रकल्प

ज्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी योजनेच लाभ घेण्यासाठी अर्ज आणि प्रकल्पाचा अहवाल घेऊन बँकेत अर्ज करावा.


Ten Important Farm Machinery with Uses

  Ten Important Farm Machinery in India with Uses Plough : Tractor Ploughing is the most common and efficient farming practice. Plough is th...