दूधानंतर आता शेणालाही चांगले दिवस येणार! आता पेट्रोल-सीएनजीवर नाहीतर थेट शेणावर चालणार कार:
यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. शेतकऱ्यांसाठी (Department of Agriculture) ही कार प्रचंड फायदेशीर ठरणार आहे. मारुती सुझुकीचे सीएनजी मॉडेल बायोगॅसने चालवता आले, तर ती क्रांतीच ठरेल. भारतात गायीला (Cow Dung) नेहमीच उच्च दर्जा दिला गेला आहे. गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट उपयुक्त असते.
दूध, शेण आणि मूत्र यानंतर आता ते तांत्रिक पातळीवरही सिद्ध होताना दिसत आहे. सुझुकी आता अशाच एका तंत्रज्ञानावर काम करत आहे. वाढते प्रदूषण आणि महागडे तंत्रज्ञान हाताळण्यासाठी कंपनीने बायोगॅस प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. शेणापासून बायोगॅस (Biogas) तयार केला जातो, त्यामुळे आपल्या देशात त्याची निर्मिती करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील.
आता सुझुकी आगामी काळात आफ्रिका, आसियान आणि जपानसह अनेक देशांमध्ये बायोगॅस सुरू करून निर्यात करण्याचा विचार करत आहे. सुझुकीने भारत सरकारच्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि बनास डेअरीसोबत सामंजस्य करारही केला आहे.
No comments:
Post a Comment