Blog Archive

Sunday, 16 April 2023

लाल आणि इलायची केळीचं उत्पादन

 लाल आणि इलायची केळीचं उत्पादन


केळी उत्‍पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. जगात आढळणाऱ्या केळीच्या 300 प्रजातींपैकी सुमारे 30-40 प्रजाती भारतात आढळतात.भारतातील एकूण केळीच्या उत्‍पादनापैकी सुमारे ५० टक्‍के उत्‍पादन महाराष्‍ट्रात होते.केळी हे पौष्टिक फळ असून ते वर्षभर उपलब्ध असते त्यामुळे केळीला गरिबांचे फळ म्हणतात. केळीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते जे शरिराला लगेच ऊर्जा देते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करते. लाल केळी आणि वेलची केळी या दोन प्रकारात देशातील तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांची मक्तेदारी होती.

 इलायची केळी

इलायची केळीमध्ये अनेक प्रथिने असून याचा फायदा अनेक विकारांवर होत असल्याचे मानतात. हिरवी दिसणारी आणि केवळ 2 ते 3 इंच लांबी आणि आकाराने गोलसर असणाऱ्या वेलची केळीचा स्वाद अगदी पेढ्याप्रमाणे असतो.इलायची केळी नेहमीच्या केळीपेक्षा आकाराने लहान असते आणि सालही बऱ्यापैकी पातळ असते. चव सामान्य केळीपेक्षा गोड असते. महाराष्ट्रात या केळीला इलायची, कर्नाटकमध्ये येलक्कई तर बिहारमध्ये चीनीया म्हणतात.


इलायची केळीचे आरोग्यदायी फायदे

1. केळीमध्ये कर्बोदके, अ जीवनसत्व, लोह आणि सफरचंदापेक्षा तीनपट जास्त फॉस्फरसचे प्रमाण असते. 

2. पोटॅशियम, फायबर आणि नैसर्गीक साखर केळीमध्ये मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते.

3. ह्रदयाचे ठोके नियमित राहण्यासाठी, कमी रक्तदाब, शरिरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी इलायची केळी फायदेशीर आहे.

4. जास्त प्रमाणात पोटॅशिअम आणि कमी प्रमाणात सोडीअम असल्यामुळे इलायची केळी उच्च रक्तदाब, ह्रदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहे.


5. मजबूत हाडे आणि दातांसाठी कॅल्शियम आणि पोटॅशियम ही दोन महत्वाची खनिजे आवश्यक असतात. इलायची केळीमधून ही दोन्ही खनिजे मुबलक प्रमाणात मिळतात. पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्त प्रवाह नियंत्रित राहतो. कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे वयानुसार हाडे, दात कमकुवत होणे तसेच हाडांचा ठिसूळपणा इ. समस्यांवर फायदेशीर आहे.

6. स्टार्च आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे. सुक्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लूकोज या नैसर्गिक साखरेमुळे फळाचा गोडवा वाढतो. पेक्टिन आणि विद्राव्य फायबरचे मध्यम प्रमाण असते, जे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.

7. इलायची केळीमध्ये फॉलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. फॉलिक ऑसिडचा वापर गर्भधारणेच्या काळात आवश्यक असलेले अतिरिक्त रक्त तयार करण्यासाठी केला जातो. केळीमध्ये भरपूर प्रमाणात लोह देखील असते, जे अशक्तपणा टाळण्यास मदत करते.

इलायची केळीचे आरोग्यासाठी एवढे सगळे फायदे असल्यामुळे तिची लोकप्रियात दिवसेंदिवस वाढत आहे.

लाल केळी 

लाल रंगाची केळी ही आयुर्वेदात अतिशय औषधी आणि गुणकारी म्हणून ओळखली जातात. याचमुळे  या केळींना फार मोठी मागणी आहे.या प्रजातीच्या वनस्पतींची उंची 4 ते 5 मीटर आहे. या जातीची साल लाल व केशरी रंगाची असून फर दाट असते. लाल रंगाच्या केळ्यांची चव गोड असते. प्रत्येक घडामध्ये 80 ते 100 फळे असतात. त्यांचे वजन 13 ते 18 किलो असते. लाल केळीची ही जात महाराष्ट्रातील ठाणे भागात घेतली जाते.

लाल केळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यात पोटॅशियम मोठ्या प्रमाणात तर सोडियम कमी प्रमाणात असल्याने हे ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.




लाल केळी खाल्ल्याने कॅन्सर, हृदय विकार , मधुमेह, डोळ्यांचे विकार हे आजार दूर ठेवण्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याचं मानलं जातं.याशिवाय पचनसंस्था अत्यंत परिणामकारक चालण्याचे कामही या लाल केळ्यांमुळे होते.

लाल रंगाची केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे नियमितपणे खाल्ल्याने शरीर तंदुरुस्त राहतेच शिवाय अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण होते.



लाल केळ खाण्याचे फायदे

1. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत

2. लाल केळी डोळ्यांसाठी फायदेशीर

3. वजन नियंत्रित ठेवण्यास मदत

4. अशक्तपणा कमी करण्यास लाभदायक

5. इन्संट एनर्जी












No comments:

Post a Comment

Ten Important Farm Machinery with Uses

  Ten Important Farm Machinery in India with Uses Plough : Tractor Ploughing is the most common and efficient farming practice. Plough is th...